उन्हाळा वाढल्याने घरोघरी होणारे लिंबू शरबत आता तुरळक झाले आहे कारण आहे की लिंबू महाग झाला आहे. व्हिटॅमिन सि ने भरपूर असणारा लिंबू अनेक कारणाने गुणकारी आहे.
काय आहे कारण
यंदा लिंबू चे उत्पादन कमी आहे अनेक शेतकऱ्यांनी लिंबू लागवड केली नाही . लिंबू उत्पादनाला पोषक नसलेले वातावरण . वाढलेली मागणी, व वाहतुकीचा वाढलेला खर्च त्यामुळे लिंबू कधी नव्हे ते 300 ते 250 रुपये प्रति किलो झाला आहे.या मुळे मात्र सामान्य माणूस लिंबू परवडनेसा झालाय.
शेतकरी खुश
कधी नव्हे ते लिंबाला 250 ते 300 रुपये किलो भाव मिळत असल्यामुळे बळीराजा सुखावला आहे. आता पर्यंत चा सर्वात उच्चाक लिंबू ने या वर्षी गाठला आहे. त्यामूळे लिंबू उत्पादक शेतकरी अन्नदाता समाधानी आहे.
सामान्य माणूस
सोसिएल मीडिया वरती मात्र लिंबूचे अनेक मिम्स येत आहेत. आणि वाढलेला भाव मात्र लिंबू खरेदी करू देत नाहीये. सामान्य माणसाला लिंबू या वेळेला तरी लक्झरी वाटत आहे.
लिंबाचे महत्व
लिंबू व्हिटॅमिन सि ने भरपूर असे फळ आहे. तसेच लिंबू पाणी पिल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकून राहते.
लिंबू पाणी पिल्याने शरीरावर कांती येते . तसेच वजन कमी करण्यासाठी आणि शारीरिक रोगप्रतिकारक शक्ती टिकवण्यासाठी लिंबू फायदेशीर आहे