कोल्हापूर : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात यायचे असेल तर कोव्हिड चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. कोविड चाचणी केली नसेल तर 7 दिवस क्वारंटाईन राहावे लागणार आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी हा आदेश दिला आहे. कोल्हापूर हे रेल्वे चे टर्मिनल असून अनेक भागातून श्री महालक्ष्मी अंबबाई हीचा आशीर्वाद घ्यायला अनेक भाविक संपूर्ण देशातून येतात.
कोल्हापुरात बाहेरील जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात नागरिक येत असल्यामुळे जिल्हा प्रशासनाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कोरोनाची लस घेतली असेल तर चाचणी बंधनकारक नसणार आहे. राज्यात कोरोनाचे रुग्ण आता झपाट्याने वाढू लागल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्याचं प्रशासनापुढे मोठं आव्हान आहे. इतर जिल्ह्यातील येणाऱ्या नागरिकांमुळे कोरोनाचा प्रसार होत असल्याने कोल्हापुरात आता बाहेरुन येणाऱ्या व्यक्तींसाठी कोरोना चाचणी सक्तीची करण्यात आली आहे.