कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं महत्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यात पुन्हा लॉकडाऊन केला जाणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र 30 एप्रिलपर्यंत काही कडक निर्बंध आणले आहेत. लॉकडाऊन नसला तरी नियम मात्र कडक केले आहेत.
काल राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. लॉकडाऊन नसला तरी नियम मात्र कडक केले जाणार आहेत. मंत्री नवाब मलिकांनी सांगितलं की, कोरोनाला रोखण्यासाठी काही महत्वाचे निर्णय घेतले. काही कडक निर्बंध राज्यात घालण्यात आले आहेत. शुक्रवार रात्री 8 ते सोमवार सकाळी 7 वाजेपर्यंत लॉकडाऊन असेल, असं नवाब मलिक यांनी सांगितलं. तसेच नाईट कर्फ्यू देखील लागू असेल असं त्यांनी सांगितलं.
कसे आहेत नवे नियम
अत्यावश्यक सेवेतील लोकांनाच गाडी चालण्याची परवानगी
रात्री केवळ अत्यावश्यक सेवा सुरु राहतील
धार्मिक स्थळांवर निर्बंध असतील
सिनेमागृह, नाट्यगृह संपूर्णत: बंद
गार्डन, मैदाने बंद
जिथे केसेस वाढतायेत तेथील निर्णय घेण्याचा अधिकार स्थानिक प्रशासनाला
सिनेमा, मालिकांचे शुटींग मोठ्या संख्येनं करता येणार नाही
रिक्षा- ड्रायव्हर + 2 लोक
बसमध्ये केवळ बसून प्रवास करता येईल
टॅक्सीत मास्क घालावा
कार्यालयांना वर्क फ्रॉम होम सुरू करण्याच्या सूचना
मंत्रालय, महत्वाचे ठिकाणी व्हिजिटर्स बंदी
चित्रपट शूटिंगला परवानगी आहे, पण गर्दी करू नये, लढाई, आंदोलन असे सीन असतील त्या शूटिंगला बंदी
बाजारपेठांमध्ये मर्यादित संख्येनं सोडलं जाईल
शाळा कॉलेज बंद, इंडस्ट्री चालू राहतील
प्रतिबंधित क्षेत्र तयार करा
सोसायटीच्या बाहेर बोर्ड लावायचा अन्यथा दंड आकारणार
20 लोकांना अंत्यविधींसाठी परवानगी
लग्नसमारंभांबाबत लोकांची संख्या मर्यादित
विमान प्रवासाबाबत कोणतेही बदल नाहीत मात्र, टेस्टिंग कडक करणार
शुक्रवार रात्री 8 ते सोमवार सकाळी 7 पर्यंत लॉकडाऊन
लोकल ट्रेन सुरू राहणार
जिम बंद होणार
अत्यावश्यक सेवांना परवनगी
रेस्टॉरंट, मॉल टेक अवे सर्व्हिस सुरु राहणार
वाढता कोविड प्रादुर्भाव पहाता उद्योग जगताने काही कालावधीसाठी कारखान्यात आवश्यकते एवढेच कामगार बोलवावेत, प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उद्योगांना त्यांच्या कारखान्याच्या आवारातच कामगारांची राहण्याची व्यवस्था करणे शक्य आहे ती त्यांनी करावी, जिथे वर्क फ्रॉम होम करणे शक्य आहे तिथे ते केले जावे, जो कामगार कोविड बाधित होईल त्या कामगाराच्या भले ही तो कंत्राटी कामगार असेल त्याच्या कुटुंबाची जबाबदारी घेऊन त्यांची रोजीरोटी चालू राहील याची काळजी घ्यावी असे सांगतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोविड विरोधात लढतांना एका कुटुंबाप्रमाणे आपण एकत्रितरित्या या संकटाला सामोरे जाऊ आणि त्यावर मात करू असे आवाहन केले.
अनेक डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार जर आपण एप्रिल महिन्यात आलेली ही वाढती कोरोना रुग्ण संख्या कमी करू शकलो तर आपण पुढे येणाऱ्या कोरोना रुग्नसंखेत रोखू आणि कोरोना लाटेला आडा घालण्यात हे उपाय केल्यास नक्की फायदा होईल. आज महाराष्ट्रात रुग्ण संख्या वाढली असून अनेक लोक मृत्यू झाल्याचे आढळून येते आहे.