मुंबई : राज्यात परिस्थिती आणखी बिघडली तर संपूर्ण लॉकडाऊन करण्यात येईल, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.
कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने होणारी वाढ पहाता काही दिवसांनी राज्यातील आरोग्य व्यवस्थेवर ताण येईल, त्यामुळे इच्छा नसताना निर्णय घ्यावा लागणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. काल (गुरुवारी) तब्बल 43 हजार कोरोना बाधितांची नोंद झाली. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जनतेशी फेसबुक च्या माध्यमातून संवाद साधला. मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील ठळक मुद्दे.
पहिल्या दिवसाचीच परिस्थिती कायम आहे, पण आपण मधल्या काळात गाफील झालो. आता कोरोनाशी लढताना आपण परिस्थितीत पाय घट्ट रोवून उभे राहुया. विरोधकांना विनंती करतो, की जनतेच्या आरोग्याशी खेळू नका. लॉकडाऊन जाहीर करत नाही, पण मी इशारा देत आहे. दृश्य स्वरुपातीव परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय लवकरच घेणार.
महाराष्ट्र राज्य सरकार हे खंबीर आहे. आरोग्य सुविधांची कमतरता जाणवू देणार नाही. सर्वांच्या सहकार्याचीच मी अपेक्षा करतो. सणांवरही निर्बंध आणावे लागतील. नागरिकांकडून सहकार्याची अपेक्षा करत कोरोनाविरोधातील लढाई लढण्यासाठी सिद्ध व्हा, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी देत राज्यात कठोर निर्बंध लागणार असा इशारा दिला आहे.
मुख्यमंत्र्यांचे बोलण्यातील महत्वाचे मुद्दे :
“मी भीती दाखवायला नाही तर, तुम्हाला साचेत करायला आलोय. राज्यात कोरोनाची परिस्थिती अशीच राहिली तर राज्यात संपूर्ण लॉकडाऊन करण्यात येईल ”
कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने होणारी वाढ पहाता काही दिवसांनी राज्यातील आरोग्य व्यवस्थेवर ताण येईल. काही दिवसांत रुग्णालय फुल्ल होण्याची शक्यता आहे.
“मला आज पुन्हा एकदा सर्वांना आवाहन करायचे आहे. कोरोनाच्या बाबतीत आपण थोडेसे बिनधास्त झालो. सर्व काही सुरू झाले आहे, लग्ने, आंदोलनं, जणू कोरोनाव्हायरस पूर्णपणे संपला आहे. आपण सावधगिरी बाळगली पाहिजे”
“येत्या काही दिवसांत दररोज अडीच लाख आरटी-पीसीआर चाचण्या करण्याचे आमचे लक्ष्य ”
लस ही छत्रीप्रमाणे आपले पावसापासून संरक्षण करणारी आहे. मात्र, हा पाऊस नाही, हे वादळ आहे ”
“आम्ही पायाभूत सुविधांचा विस्तार करीत आहोत पण आम्हाला डॉक्टर आणि आरोग्यसेवा कामगार कोठे मिळतील?”
“आज संपूर्ण लॉकडाऊनचा फक्त इशारा देतोय. परंतु, परिस्थिती बिघडल्यास पुढच्या काही दिवसात निर्णय घ्यावा लागेल. ”
“अनेक लोक आम्हाला सूचना देत आहेत पण मदत म्हणून त्यांच्याकडून आतापर्यंत महाराष्ट्राला काही मिळालं नाही.”