बॉलिवूड अभिनेत्री मलायका ही आपल्या शरीराला अगदी फिट आणि निरोगी ठेवत असते. नेहमी वायरल होणाऱ्या रील्स, व्हिडियो, मुलाखतीतून आपल्या फिटनेस बाबत काही टिप्स शेअर् करत असते. अरोरा तिच्या चाहत्यांना नेहमीच असे काही सोपे उपाय सांगत असते, जेणेकरून तिच्या चाहत्यांना फिट राहण्यास मदत होईल. तिने सांगितलेले काही सोपे व्यायाम, डाएट टिप्स, योगा या सगळ्या गोष्टीच फिटनेसच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या ठरतात. त्यामुळे दर आठवड्यातच तिच्याकडून फिटनेस टिप्स ऐकण्यासाठी तिचे चाहते उत्सूक असतात. या आठवड्यात तिने एक अत्यंत सोपा उपाय सांगितला असून त्यासाठी अवघा ३० सेकंदाचा वेळ लागतो. शिवाय तुम्ही तुम्हाला आरामदायी वाटलेल्या कोणत्याही जागी हा उपाय करू शकता. कोणतेही पैसे पेड न करता जर आपण आपल्या शरीराला निरोगी, सुदृढ, आणि आकर्षक ठेवत असू तर शरीरयष्टी ही अधिकच सुदंर दिसते. आणि म्हणून यासाठी काही उपाय बॉलिवूड अभिनेत्री खालील प्रकारे सांगितले आहे.
मलायका अरोरा म्हणते,
आरोग्यासाठी, मानसिक त्रास कमी करण्यासाठी केवळ ३० मिनिटांत आपण काय करू शकतो, असा विचार कोणाच्याही मनात येणं अगदी साहजिक आहे. पण हा उपाय अतिशय लाभदायी असल्याचं मलायका सांगते.
~ मांडी घालून किंवा खुर्चीवर ताठ बसा. दोन्ही तळहात एकमेकांवर ५ ते ६ सेकंद घासा आणि त्यानंतर पुढचे २० ते २५ सेकंद तळहात डोळ्यांवर ठेवून शांत बसून रहा.
~ मलायका म्हणते ३० सेकंदात होणारी ही एक सोपी कृती तुमच्या मानसिक स्वास्थ्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. ही कृती तुम्ही ५ ते ६ वेळा करू शकता.
~ तळहात घासून डोळ्यांवर लावण्याचे फायदे१. मनावरचा ताण कमी होण्यास मदत होऊन मन रिलॅक्स होण्यास मदत होते. काही सेकंदासाठी तरी आपण आपल्या चिंता, काळजी विसरतो आणि तणावमुक्त होतो.
~ शरीराचा थकवा घालविण्यासाठीही या व्यायामाचा फायदा होतो. शिवाय हा उपाय केल्यानंतर हातांमध्ये जी उर्जा निर्माण होते, ती डोळ्यांभोवती असणाऱ्या ६ स्नायुंसाठी अतिशय उपयुक्त् ठरते. यामुळे डोळ्यांचा थकवा घालविण्यासाठीही उपयोग होतो.
~ या व्यायामामुळे डोळ्यांभाेवती रक्ताभिसरण अधिक उत्तम प्रकारे होते. त्यामुळे डोळे रिलॅक्स तर होतातच शिवाय डार्क सर्कल्स कमी करण्यासाठीही उपयोग होतो.