मंकीपॉक्स हा व्हायरस लहान मुलांकरता अतिशय धोकादायक आहे. इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा व्हायरस लहान मुलांबाबत अधिक संवेदनशील आहे. जगभरात मंकीपॉक्स व्हायरसचा धोका वाढत आहे. यामुळे भारतातही विशेष खबरदारी घेतली जात आहे.पालकांनी लहान मुलांची विशेष काळजी घ्यायला हवी. लहान मुलांच्या आरोग्याकडे अधिक बारकाईने पाहायला हवं. त्यांचा दिनक्रम आणि शरीरातील बदल यांकडे लक्ष द्यायला हवं.
१.अंगदुखी
२. रॅशेस
३. प्रचंड ताप
४. असंख्य लिम्फॅडेनोपॅथी
५. लिम्फ नोड्स वाढणे
वरील लक्षणे आढळल्यास लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. आणि लहान मुलांचे आरोग्य जपावे .१९८० नंतर ज्या लोकांना स्मॉलपॉक्सची लस दिली जात नसे त्या कुटुंबातील युवांना याचा धोका अधिक असेल. स्मॉलपॉक्सची लस या संक्रमणाविरोधात इम्युनिटी वाढवण्यास मदत करते. म्हणून घाबरण्याची गरज नाही.