सर्वसामान्य लोकांच्या जीवनात उल्लेखनीय बदल घडवून आणण्यासाठी काम करणाऱ्या महात्मा जोतिराव फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर लवकरच एका बायोपिकची निर्मिती केली जाणार आहे. देशामध्ये सामाजिक बदल घडवून आणणाऱ्यांमध्ये आणि महिलांना शिक्षण मिळवून देण्यात महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांची महत्त्वाची भूमिका आहे. त्यांचं हे योगदान कधीही विसरण्याजोगं नाही.
चित्रपटात अभिनेता प्रतीक गांधी आणि अभिनेत्री पत्रलेखा हे दोघेही मुख्य भूमिकेत झळकणार आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी या सिनेमाचं पोस्टर शेअर केलं आहे.फुले सिनेमाचं पहिले पोस्टर नुकतंच प्रदर्शित झालं आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक अनंत महादेवन यांनी या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे.
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती दीनी ‘फुले’ उधळली:
सिनेमात प्रतीक गांधी आणि पत्रलेखा यांच्या व्यतिरिक्त आणखी कोण कोण कलाकार असणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र हे पोस्टर पाहून अनेकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. ‘फुले’ सिनेमाचं पोस्टर महात्मा फुले यांच्या १९५ व्या जयंती दिनी रिलीज करण्यात आलं आहे. सिनेमाच्या पोस्टवर प्रतीक आणि पत्रलेख हुबेहुब महात्मा फुले आणि सावित्रीबाईंसारखेच दिसत आहे. या पोस्टरमुळे लोकांची उत्सुकता आता वाढली आहे.महात्मा फुले यांची आज १९५ वी जयंती आहे. त्यानिमित्ताने ‘फुले’ या सिनेमाच्या फर्स्ट लूकचं अनावरण करण्यात आलं आहे. हा सिनेमा पुढील वर्षी २०२३ ला प्रदर्शित होणार आहे.