Motorola लवकरच भारतात आपला नवा तगडा स्मार्टफोन लॉन्च करीत आहे. ज्याचे खास फीचर्स आणि डिझाइन तुम्हाला वेड लावेल. चला जाणून घेऊया या जबरदस्त फोनबद्दल :
Motorola आपला नवीन G सीरीज स्मार्टफोन लॉन्च करण्याच्या तयारीत आहे, ज्याचे नाव आहे Moto G72 असेल. यूएस फेडरल कम्युनिकेशन्स कमिशन (FCC), दूरसंचार आणि डिजिटल गव्हर्नमेंट रेग्युलेटरी अथॉरिटी (TDRA) UAE, भारतीय मानक ब्यूरो (BIS) आणि IMEI यासह अनेक साइटवर हे मॉडेल दिसले आहे. मागीलवर्षी लॉन्च झालेल्या Moto G71 ची पुढची आवृत्ती असेल अशी अपेक्षा वर्तवण्यात आली आहे.
Moto G72 launch Date
Moto G72 स्मार्टफोन FCC, TDRA आणि BIS वेबसाइटवर तसेच मॉडेल क्रमांक XT2255 सह IMEI डेटाबेसवर दाखवण्यात आहे. डिव्हाइसची FCC सूची सूचित करते की ते 5,000mAh च्या बॅटरी क्षमतेसह येईल. NFC आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी पर्यायांना सपोर्ट करतो. अद्याप कंपनीद्वारे या फोनची ऑफिसिअल रिलीज तारीख आली नाही, मात्र लवकरच लाँच तारीख आपल्याला कंपनीद्वारे बघायला मिळेल अपेक्षा आहे.
Moto G72 जलद चार्जिंग फिचर्स
हा फोन 33W जलद चार्जिंगसाठी सपोर्ट मिळू शकेल , Moto G72 ची BIS सूचीनुसार हे मॉडेल भारतात लवकरच लॉन्च केले जाणार आहे. अलीकडे, मोटोरोला भारतीय आणि जागतिक बाजारपेठेत अनेक फोन लॉन्च करत आहे असे दिसून येते . या महिन्याच्या सुरुवातीला, कंपनीने भारतात Moto G32 आणि Moto G62 हे मॉडेल लॉन्च केले.
Moto G72 चे खास फीचर्स
Moto G72 हा Moto G71ची पुढील आवृत्ती म्हणून लॉन्च केला जाणार असून Qualcomm च्या Snapdragon 695 SoC, 5,000mAh बॅटरी, 33W TurboPower फास्ट चार्जिंगसह फिचर्स सोबत भारतात लवकरच लॉन्च होईल. डिव्हाइसमध्ये ट्रिपल-रीअर कॅमेरा सेटअप तसेच पंच होलसह 6.4-इंचाचा AMOLED डिस्प्ले असणार आहे . हा फोन 6GB + 128GB वेरिएंटनुसार 15,999 रुपयांच्या बेस किमंतीनुसार उप्लब्धत होण्याची शक्यता आहे.