अनेक महानगरात आजही चित्रपट बघायचे असल्यास अनेकांची पसंती PVR आणि Inox या दोन मल्टिप्लेक्स आहेत याची शंका नाही. दमदार साऊंड सिस्टीम, उत्तम व्हिडिओ क्वालिटी आणि सुखावणारा चित्रपटाचा आनंद देण्याचे आश्वासन ह्या दोन्ही कंपन्या देतातच. त्यातच देशातील मल्टिप्लेक्स उद्योगात मोठा बदल होणार आहे.
View this post on Instagram
भारतातील या दोन सर्वात मोठ्या मल्टिप्लेक्सची साखळी असलेला पीव्हीआर सिनेमा आणि आयनॉक्स यांच्यातील विलीनीकरणाला मंजुरी देण्यात आली आहे. वास्तविक, पीव्हीआर आणि आयनॉक्स कंपनीच्या बोर्डांची रविवारी हा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी बराच वेळ बैठक पार पडली होती. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. या विलीनीकरणानंतर पीव्हीआरचे सीएमडी अजय बिजली हे कंपनीचे नवे व्यवस्थापकीय संचालक असतील.
या करारानंतर आता चित्रपट प्रदर्शन उद्योगाचे नवे रूप पाहायला मिळणार आहे. विलीनीकरणानंतर, पीव्हीआर आणि आयनॉक्स लीजर यांच्याकडे संयुक्तपणे भारतभर १,५०० पेक्षा जास्त स्क्रीन्स असतील.