Rajinikanth Dadasaheb Phalke Award :
केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी याची घोषणा केली आहे. रजनीकांत यांना सिनेसृष्टीतील सर्वोच्च समजला जाणार दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे.साऊथ इंडियन सुपरस्टार रजनीकांत यांना सिनेसृष्टीतील सर्वोच्च समजला जाणार दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे.केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी याची घोषणा केली आहे. 51 वा दादासाहेब फाळके पुरस्काराने 3 मे रोजी रजनीकांत यांचा गौरव करण्यात येणार आहे.
मुझे इस बात की अत्यंत खुशी है कि 2019 का दादासाहेब फ़ाल्के अवार्ड रजनीकांत को मिला है।
5 सदस्यों की ज्यूरी @ashabhosle @SubhashGhai1 @Mohanlal @Shankar_Live #BiswajeetChatterjee ने एकमत से इसकी सिफारिश की है।— Prakash Javadekar (@PrakashJavdekar) April 1, 2021
रजनीकांत यांना थलायवा आणि देव मानलं जातं.
रजनीकांत यांना दक्षिण सिनेसृष्टीत थलायवा म्हटलं जातं. रजनीकांत च्या सिनेमा पाहण्यासाठी हजारो लोक सकाळी ४-५ वाजेपासून तिकिटासाठी रांगा लावतात. त्याच्या अनेक चित्रपटांच्या पोस्टर्स वर फुले आणि दुधाचा अभिषेक घालण्यात येतो.
वयाच्या 25 व्या वर्षी सिनेकारकिर्दिला सुरुवात
रजनीकांत यांनी वयाच्या 25 व्या वर्षी फिल्मी करिअरची सुरुवात केली. त्यांचा पहिला तमिळ चित्रपट ‘अपूर्वा रागनगाल’ हा होता. या सिनेमात त्यांच्यासोबत कमल हासन आणि श्रीविद्या हे देखील होते. 1975 ते 1977 दरम्यान त्यांनी बहुतेक चित्रपटांमध्ये कमल हसनसोबत खलनायकाची भूमिका केली. मुख्य भूमिकेत ‘भैरवी’ हा त्यांचा पहिला तमिळ चित्रपट होता. चित्रपट हिट ठरला आणि तिथून रजनीकांत यांचा सुपरस्टार पर्यंतचा प्रवास सुरु झाला.
रजनीकांत यांच्या हटके स्टाईलचे लाखो चाहते
टॉलिवूडमध्ये आपली वेगळी छाप पाडल्यानंतर रजनीकांत यांना बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली. ‘अंधा कानून’ चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. बॉलिवूडमध्येही आपल्या दमदार अभिनय आणि वेगळ्या स्टाईलच्या जोरावर त्यांना लोकांची मनं जिंकली. त्यांच्या स्टाईलने अनेकांना वेड लावलं. त्याची सिगारेट फ्लिप करण्याची स्टाईल, कॉईन उडवण्याच हटके स्टाईल, गॉगल घालण्याची आणि हसण्याची स्टाईल अशा अनेक गोष्टी चाहत्यांच्या मनात घर करुन गेल्या. रजनीकांत यांची स्टाईल केवळ देशातच नव्हे तर परदेशातही कॉपी केली गेली.