साऊथ इंडस्ट्रीमधून आलेल्या एका बातमीने सगळ्यांनाच हैराण झाले. ते म्हणजे ‘द फॅमिली मॅन’ अभिनेत्री सामंथा रूथ प्रभू आणि ‘लाल सिंह चड्ढा’ फेम अभिनेता नागा चैतन्य (Naga Chaitanya) यांचा घटस्फोट. दोघांनी लग्नाच्या 4 वर्षांनंतर वेगळं होण्याचा निर्णय घेतला त्यामुळे या दोघांच्या चाहत्यांना घटस्फोटाच्या बातमीने खूप मोठा धक्का बसला.
मिळालेल्या माहितीनुसार, घटस्फोटानंतर लगेच सामंथाने (Samantha Ruth Prabhu)अल्लू अर्जून आणि रश्मिका मंदाना स्टारर सिनेमा ‘पुष्पा'(Pushpa) मध्ये आयटम साँग करण्याचा निर्णय घेतला आहे.
नागा चैतन्यपासून घटस्फोट घेतल्यानंतर हा निर्णय लगेच समांथाने घेतल्याची बातमी आहे. त्यामुळे चाहते असा अंदाज लावत आहेत की लग्नादरम्यान नागा हा खूप रूढिवादी व्यक्ती असावा आणि त्याने समंथावर अनेक बंधने लादण्याचा प्रयत्न केला असेन. घटस्फोट घेताच समंथाने पुष्पासाठी आयटम साँग साइन केले यामुळे सामंथा सोशल मीडियावर भरपूर ट्रेंड झाली.
View this post on Instagram
नागा चैतन्यवर जुन्या विचारांचा व्यक्ती असल्याचा आरोप करत लोकांकडून होऊ लागला आहे.लोक म्हणतात की, सामंथाने याआधी कधीही अशा प्रकारच्या भूमिका केल्या नव्हत्या त्यामुळे कदाचित नागाने सामंथावर बंदी घातलेली असेल पण मात्र काही लोकांनी नागा यांनाही पाठिंबा दिला आहे. नागाला पाठिंबा देणारे लोक म्हणतात कारण की जर तो जुन्या विचारांचा माणूस असता तर त्याने कोणत्याही परिस्थितीत अभिनेत्रीशी लग्न केले नसते.
नागा आणि सामंथा यांनी 2017 मध्ये लग्न केले होते आणि आता त्यानीं 4 वर्षांनी म्हणजे या वर्षी 2 ऑक्टोबर ला घटस्फोटाची घोषणा केली होती मात्र अजूनही त्यांच्या घटस्फोटाचे मुख्यकारण हे काही लोकांना समजले नाही त्यामुळे अनेक लोक तर्क-वितर्क लावत आहे.