आपली लाडकी माया म्हणजे रुचिरा जाधव हिच्या बहिणीचा वाढदिवस नुकताच मुंबई येथील एका हॉटेल मध्ये साजरा करण्यात आला. रुतुजा असे आपल्या लाडक्या माया म्हणजेच रुचिरा च्या बहिणीचे नाव आहे. हा कदाचित तिच्या बहिणीचा माहेरचा शेवटचा वाढदिवस आहे असे ती सांगते.

रुतुजा लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे. आपल्या बहिणीबरोबर पार्टी आयोजित करून वेळ घालवून तिला रुचिरा खूप प्रेम ओवाळून टाकत आहे. २६ एप्रिल ला रुतुजा चा वाढदिवस होता, त्यासाठी रुचिरा ने एक छान सरप्राइज पार्टी आयोजित केली होती. आपल्या बहिणीला सरप्राइज कसे द्यावे हे आपल्या लाडक्या माया च्या इंस्टाग्राम स्टोरीज वरून बघायला मिळते.
सोबतच तिने आपल्या बहिणीला प्रश्न उत्तर ब्लाइंड फोल्ड करून दिले, ते पण चाहत्यांना फार आवडले आहे. आपल्या भावडांवर जीव कसा ओवाळून टाकावा हे ह्या पोस्ट पाहून लगेचच आपल्या लक्षात येईल.

