मुंबई : अभिनेत्री सामंथा रुथ प्रभू ही सिनेसृष्टीतली एक प्रसिद्ध अभिनेत्री असून आत्तापर्यंत तिने तामिळ आणि तेलुगूत अनेक हिट सिनेमा दिले आहेत. तिने तिच्या वेगळ्या अभिनयाच्या शैलीने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. नुकतंच तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत तिच्या चाहत्यांना एक खास गिफ्ट दिलं आहे. ती म्हणजे नुकतीच तिने तिच्या प्रोडक्शन हाऊसची घोषणा केली आहे. हे ऐकल्यानंतर तिचे चाहते खूप खूश झाले आहेत.
इन्स्टाग्रामवर सामंथाने एक व्हिडीओ शेअर केला आहे. जो सोशल मीडियावर भरपूर व्हायरल झाला आहे. फॅन्सनेदेखील या व्हिडीओचं भरभरुन कौतुक केलं आहे आणि या प्रोडक्शन हाऊसला शुभेच्छा दिल्या आहे.
View this post on Instagram
सामंथाने इन्स्टाग्राम वर हा व्हिडीओ पोस्ट करत सामंथाने लिहीलं की, “माझ्या नव्या आणि स्वत:च्या प्रोडक्शन हाऊस त्रालाला मूव्हिंग पिक्चर्सची घोषणा करताना मला खूप आनंद होत आहे. ट्रालाला मूव्हिंग पिक्चर्सचं मुख्य उद्दिष्ट नवीन युगातील अभिव्यक्ति आणइ विचार प्रतिनिधी कंटेंट तयार करणं आहे. एक पोषण स्थान जो त्या कहाणींना आमंत्रित आणि प्रोत्साहित करतो जो आमच्या सामाजिक फॅब्रिकची ताकद आणि जटिलता सांगते. हा एक असा मंच आहे जिथे सिने निर्मात्यांना असा कहाणी सांगण्याचा मंच जो सार्थक, प्रामाणिक आणि सार्वभौमिक आहे”
सध्या सामंथाने एक्टिंगमधून ब्रेक घेतला आहे. सध्या ती मायोसिटिस ऑटोइम्यून या नावाच्या आजाराचा सामना करत आहे. काही दिवसांपुर्वी तिने तिच्या पर्सनल लाईफबद्दल अनेक खुलासे केले होते. याविषयी बोलताना सामंथा रुथ प्रभू म्हणाली की, ‘मी अयशस्वी विवाहाच्या सर्वात खालच्या टप्प्यावर पोहोचलो आणि त्यावेळी माझे आरोग्य आणि काम या दोन्हींवर परिणाम झाला. हे माझ्यासाठी तिहेरी धक्क्यासारखं होतं. त्यादरम्यान, मी अशा अभिनेत्यांबद्दल वाचलं होतं जे आरोग्याच्या समस्यांमधून गेले आणि त्यांनी पुनरागमन केलं. त्यांच्या स्टोरी वाचून मला मदत झाली किंवा माझे मनोबल वाढलं. जर त्यांनी ते हे करु शकतात तर मी देखील करू शकते हे जाणून घेण्याचे बळ यामुळे मला मिळालं.”
साध्य सामंथाच्या नव्या प्रोडक्शन हाऊस – त्रालाला मूव्हिंग पिक्चर्सची याला चाहत्यांनी भरपूर शुभेच्छा दिल्या असून इंस्टा वर कमेंट चा वर्षाव केला आहे.