थंडी म्हटले की विविध आजार उत्पन्न होणारे हे ऋतू. खरंतर थंडीच्या दिवसांत शरीराची जास्त काळजी घ्यावी लागते. थंडीच्या ऋतूमध्ये सामान्यतः स्नायू आखडले जातात. यामुळे हालचाल करणे काहीशी कठीण होऊन बसते. यामुळे शरीरात वेदना होतात हे काही वेगळ्याने सांगायला नको. यामागचे कारण म्हणजे सांध्यामध्ये असणारे श्लेष द्रव जे तापमान कमी होऊ लागले की अधिक जास्त घट्ट होऊ लागते. यामुळे सांध्यातील किंवा हाडांतील चिपचिपीतपणा, चिकटपणा कमी होतो आणि सांध्याच्या हालचाली दरम्यान वेदना होऊ लागतात. जर तुम्हाला सुद्धा हीच समस्या असेल तर थंडीच्या दिवसांत तुम्ही स्वतःला उष्ण ठेवणे खूप गरजेचे आहे. म्हणजे शरीर गरम असेल तर थंडीत सर्दी पडसेसारखे आजार दूर पळतील.
सोबतच पुरेश्या प्रमाणात पोषक तत्वांचे सेवन करणे देखील महत्त्वाचे आहे. न्युट्रिशनिस्ट लवनीत बत्रा यांनी नुकतेच आपल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये सांधेदुखीपासून आराम मिळवण्यासाठी काही नैसर्गिक उपाय सांगितले आहेत. अनेक असे औषधी गुणधर्म असणारे पदार्थ आहेत जे शरीरामधील सूज तर कमी करतातच शिवाय सांधेदुखी दूर करण्यास मदत करतात. सकाळी सकाळी होणारी गुडघेदुखी किंवा सांधेदुखी दूर करण्यासाठी हे उपाय अवश्य ट्राय करून बघाच.
फूड एक्स्पर्ट सांगतात की लसूण मध्ये डायलिल डाइसल्फ़ाइड असते जे एक एंटी इंफ्लेमेंटरी तत्व आहे. हे प्रो-इंफ्लेमेंटरी साइटोकिन्सच्या प्रभावाला नियंत्रित करते. यामुळे सूज कमी होते शिवाय संपूर्ण स्वास्थ्य सुद्धा सुधारते. तर मंडळी तुम्हाला देखील सांधेदुखी पासून सुटका हवी असेल तर आहारात लसणाचा वापर नक्की करा. अनेक जण लसूण पाहिली की नाकं मुरडतात.पण जरी चव उग्र असली तरी याचे फायदे सुद्धा तेवढेच जबरदस्त आहेत हे विशेष!
आले सुध्दा एक प्राचीन पदार्थ असून खूप काळापासून विविध आजारांवर त्याचा वापर होतो आहे. यात असणारे अँटी इफ्लेमेंटरी आणि एंटी-ऑक्सीडेंट गुणधर्म शरीरात ती तत्वे तयार होण्यापासून रोखतात ज्यामुळे खऱ्या अर्थाने शारीरिक सूज निर्माण होते. अनेक निरीक्षणांमध्ये सुद्धा हे सिद्ध झाले आहे की आले हे आर्थराईटिस मध्ये खूप फायदेशीर मानले गेले आहे. त्यामुळे तुम्ही देखील आहारात आवर्जून आल्याचा वापर केला पाहिजे.
तसेच हिवाळ्यात आल्याचा चहा, आलेपाक असे पदार्थ सुद्धा तुम्हाला खूप आराम देऊ शकतात.करडई, चुका, मेथी, कारले, वांगे, आंबा, फणस, कवठ, टोमॅटो, ताक, दही, खोबरे, गुळ, तीळ, हिंग, मोहरी, ज्वारी, बाजरी, कुळीथ, उडीद, लसुण, खजूर, तेल, मद्य, सुंठ, मिरे, जिरे, वेलची, ओवा, बदाम, खारीक, जायफळ, अक्रोड, केशर, डिंक, आंबा, पपई, टरबुज, चिंच, जीरे, लवंग इ. पदार्थ सुद्धा हिवाळ्यात उष्णता प्रदान करू शकतात. त्यामुळें थंडीत हे पदार्थ आवर्जून खा.
अक्रोड हे पोषक तत्वांनी भरपूर असते. यात अशी तत्वे असतात जी सांधेदुखीमुळे होणाऱ्या वेदना मोठया प्रमाणावर कमी करू शकतात. अक्रोड मध्ये खास ओमेगा-3 फॅटी ऍसिड सुद्धा असते जे वेदना कमी करण्यासाठी फायदेशीर समजले जाते. अक्रोड हे जरी साधे फळ वाटत असले तरी त्यापासून मिळणारे फायदे हे खूप जास्त आहेत. तुम्ही सांधेदुखीने त्रस्त असाल तर नक्कीच अक्रोडचे सेवन करा आणि आराम मिळवा. शिवाय तुम्हाला फरक दिसला तर आवर्जून इतरांना सुद्धा या फळाचे महत्त्व सांगा.
तज्ञांच्या मते, जवस, तीळ, गूळ, उसाचा रस, दही, तूप, लोणी, पनीर इत्यादींचे निरंतर हिवाळ्यामध्ये सेवन केल्यास शरीरास उष्णता निर्माण करणारे हे पदार्थ नक्कीच लाभदायक ठरतील. त्यामुळे थंडच्या वातावरणात तुम्ही आपल्या शरीराला आपण उष्णता देणारे पदार्थ खाऊन शरीरास अगदी सुदृढ ठेवू शकता. याचे परिणाम आणि महत्वाचे म्हणजे सर्दी, पडसे, थंडी लागणे, एलर्जी, नाकातून पाणी पडणे, इत्यादी प्रकार कमी होतील.