छत्तीसगड: कालच्या आढावा बैठकीत गृहमंत्री अमित शहा यांनी नक्षलवाद्यांविरोधातील कारवाईला वेग देणाचे सांगितले आहे. अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. यासाठी ह्यूमन इंटेलिजेंस आणि टेक्निकल इंटेलिजेंसची मदत घेतली जाईल. एवढेच नव्हे तर एनटीआरओ रिअल टाईम माहिती देऊन सुरक्षा यंत्रणांना मदत करेल.
छत्तीसगडच्या विजापूरमध्ये ज्याप्रकारे नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलावर हल्ला केला त्या नक्षलवाद्यांविरूद्ध आता मोठी मोहीम तयार केली गेली आहे. या मोहिमेत नक्षलवाद्यांच्या प्रमुख कमांडरांचा खात्मा करण्याची तयारी केली गेली आहे.
सुरक्षा दलांनी पीएलजीए -1 चा सर्वोच्च कमांडर हिडमा याच्यासह नक्षलवाद्यांचे सर्वोच्च कमांडर याची यादी तयार केली आहे. ज्यांच्यावर कारवाईसाठी आता कारवाईला वेग आला आहे.
शनिवारी 3 एप्रिल 2021 रोजी छत्तीसगडच्या विजापूर आणि सुकमा जिल्ह्याच्या सीमेवर नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमकी झाली. नक्षलवाद्यांनी 700 सैनिकांना घेरले आणि त्यांच्यावर हल्ला केला. या चकमकीत 22 सैनिक शहीद झाले आहेत. घटनास्थळावरून एका जवानाचा मृतदेह सापडला होता. तर 21 सैनिक बेपत्ता होते.
बेपत्ता जवानांसाठी शोधमोहीम सुरूच:
4 एप्रिल रोजी शोध मोहिमेदरम्यान आणखी 21 जवानांचे मृतदेह सापडले. एक जवान अद्याप बेपत्ता आहे, ज्याचा शोध सुरु आहे. या चकमकीत 31 सैनिक जखमी झाले आहेत, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यामध्ये कोब्रा बटालियन, डीआरजी, एसटीएफ आणि बस्तरिया बटालियनचे जवान समाविष्ट आहेत.