देशातील शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. शेअर मार्केट मध्ये अनेक लोक भरपूर, झटपट पैसे कमावण्याच्या उद्देशानेच येत असतात. अगदी काहीच महिन्यात आपले पैसे दुप्पट, तिप्पट होतील असा गैरसमज घेऊन ते बाजारात येतात आणि आपल्याकडील आहे नाही तेवढे सगळे पैसे स्टॉक मार्केट मध्ये गुंतवतात असतात.
शेअर मार्केटमधून पैसा कमावणे दिसते तेवढेही सोपे नाही.
शेअर बाजारात अनेक चढ-उतार येत असतात त्यामुळे अनेक लोकांना हेच समजत नाही की कोणता शेअर कधी खरेदी करावा कधी विकावा किंवा एखादा शेअर आपल्याकडे ठेवावा म्हणजेच होल्ड करावा की नाही?
– शेअर मार्केट आहे तर जोखीम आहे.
शेअर मार्केट म्हणजे एक प्रकारची जोखीम असते. त्यामुळे कोणत्याही कंपनीचे शेअर्स विकत घेतांना एकदा सारासार विचार करावा. त्याचे भविष्य काळात होणारे बदल, मार्केट मध्ये येणारी तेजी, मंदी इत्यादी बाबत विशेष अभ्यास करूनच हि जोखीम घ्यावी.
– सगळेच पैसे गुंतवणे चुकीचेच
आपल्याकडे असलेल्या सर्वच पैशांची गुंतवणूक करण्यापेक्षा असलेल्या जास्तीचा पैश्यांची गुंतवणूक करावी. आपल्याकडे जास्तीचा पैसा जरी असेल परंतु त्या पैशाची जर आपल्याला पुढील काळात म्हणजेच भविष्यात गरज भासणार असेल तर तो पैसा देखील शेअर बाजारात गुंतवणे कठीण ठरू शकते.
– गुंतवणूक करतांना स्वतःचे ऐका
शेअर मार्केट म्हणजे रिस्क आहे त्यामुळे मित्रमंडळी, सल्लागार, टीव्ही, वृत्तवाहिन्या सांगतील तिथे पैसा गुंतवू नका. शेवटी पैसा तुमचा आहे. त्यामुळे भविष्य काळात मार्केटमध्ये मंदी आल्यास नुकसान तुमचेच होईल. शेवटी पैसा तुमचा आहे त्यामुळे शेअर्स गुंतवतांना शांतपूर्ण विचार करून स्वतः चे ऐका.
– अभ्यासपूर्ण गुंतवणूक श्रेष्ठ
शेअर मार्केटमध्ये नफा मिळवण्याचा सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे फक्त अभ्यास. होय, आपले डोळे झाकून कोणत्याही शेअर मध्ये पैसे लावले तर तो जुगार ठरतो आणि त्यामध्ये अपयश येण्याचे प्रमाण सर्वाधिक असते. जेव्हा आपण एखाद्या शेअरचा परिपूर्ण अभ्यास करू आणि आपल्याला त्या शेअरमधून नफा होण्याची पूर्ण खात्री होईल तेव्हाच आपण त्यात गुंतवणूक करावी.
– शेअर मार्केट एक व्यवसाय, इथे भावनेला थारा नाही
शेअर मार्केट मध्ये पावलोपावली जोखीम असते. त्यामुळे आपण गुंतवलेले शेअर्स काही कारणाने खाली पडल्यास भावनिक न होता संयम ठेवणे गरजेचे आहे. उगीचच घाबरून जाऊन चुकीचा निर्णय घेतल्याने स्वतःचे नुकसान होऊ शकते.
– नफा कसा मिळवावा
शेअर मार्केटमध्ये भविष्यात नफा किंवा तोटा होईल हे निश्चित सांगता येत नाही. परंतु योग्य तो नफा मिळवण्यासाठी वेगवेगळ्या कपन्यांमध्ये अभ्यासपूर्ण गुंतवणूक करावी. म्हणजे एकूण पाच कंपनी मध्ये गुंतवणूक केल्यास कुणा एका कंपनीचे शेअर्स पडल्यास बाकी कंपन्या नक्कीच चांगला फायदा देऊ शकतात.
– मार्केटचे बारकाईने निरीक्षण करणे
कंपनी कितीही चांगली असली तरी एकदा गुंतवणूक केल्यानंतरही त्या कंपनीचा अभ्यास करत राहणे, कंपनीच्या नवीन धोरणांबाबत माहिती मिळवणे, कंपनीच्या व्यवस्थापनातील बदल इत्यादी गोष्टींबाबत जागरूक राहणे एका सफल गुंतवणूकदाराचे लक्षण आहे.
Author :
-प्रिया गोमाशे