शाहरुख खानचं नशीब त्याला मागच्या काळात म्हणावं तसं साथ देत नव्हतं असंच खरं म्हणावं लागेल. शाहरुखने घेतलेला ब्रेक कधी संपणार याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. किंग एसआरके (SRK new movie) ने पुन्हा कमबॅक करावं अशी चाहत्यांची मनापासून इच्छा होती. मात्र शाहरुख कडून कोणतेच संकेत मिळत नसल्याने फॅन्सची निराशा होत होती. पण आता सगळ्या शाहरुख खान फॅन्सना खूप मोठा दिलासा आणि सुखद धक्का मिळाला आहे.
२०२३ मध्ये शाहरुख खानचे आणखी दोन चित्रपट रिलीज होणार आहेत. जानेवारी महिन्यात येणाऱ्या (Pathaan) ‘पठाण’ चित्रपटातून शाहरुख दमदार एंट्री करणार आहे. यामुळे २०२३ ची सुरुवात धमाकेदार होणार हे निश्चित. याशिवाय राजकुमार हिरानी दिग्दर्शित (Dunki) ‘डंकी’ चित्रपटात शाहरुख दिसणार आहे.
View this post on Instagram
या चित्रपटाचा टीजर सोशल मीडियावर (Jawan teaser) शेअर करत शाहरुखने याबद्दल माहिती दिली.’जवान’ (Jawan)असं या चित्रपटाचं नाव असून एटली कुमार या नामवन्त दिग्दर्शकाने याचं दिग्दर्शन केलं आहे. २ जून २०२३ ला दणक्यात रिलीज होण्यासाठी हा चित्रपट सज्ज आहे.२०२३ हे वर्ष शाहरुखसाठी खूप खास असणार आहे. त्याच्या आणखी एका कोऱ्या करकरीत चित्रपटाचा टीजर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.अनेक दिवस या चित्रपटाबद्दल चर्चा सुरु होती. एटली आणि शाहरुख यांच्या एकत्र काम करतील, या बद्दल बरेच अपडेट समोर येत होते. या चित्रपटाचं नाव आज अखेर समोर आलं असून या ऍक्शनपॅक फिल्मसाठीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
टीजरमध्ये शाहरूख एका डॅशिंग रूपात दिसत आहे. चेहऱ्यावर खूप जखमा झालेला शाहरुख नक्की कोणती योजना आखतो आहे हे आता कळेलच.मुलगा आर्यन खानला अटक झाल्यावर झालेल्या प्रकरणामुळे शाहरुखला बराच त्रास सहन करावा लागला. त्याच्या इमेजला सुद्धा बराच धक्का पोहोचला. त्यातून सावरत आता शाहरुख पुन्हा नव्या जोशात समोर येत आहे.