सध्या सोशल मीडिया वर स्नेहा भोसले हे नाव खूप चर्चेत आहे. अनेकांना तिने गोड बोलून आणि भावनिक गुंतवणूक करून फसविले याचे अनेक प्रकरणे समोर आली आहेत. अनेकांना तिने कोरोना रुग्णांची मदत करा तुम्हाला पुण्य प्राप्त होईल असे सांगून चक्क लाखांनी फसविले आहे.तर मित्रहो ही स्नेहा भोसले म्हणजे एक फेक फेसबुक अकाऊंट आहे, हो हो अगदी बरोबर ऐकलंत. या मुलीच्या नावाने फेसबुक अकाऊंट उघडून चक्क या मुलीने कित्येक मुलांना लाखो रुपयांना गंडा घातला आहे.
असे फसविले अनेकांना:
स्नेहा भोसले या फेक प्रोफाइलच्या माध्यमातून सध्या बऱ्याच मुलांना फ्रेंड रिक्वेस्ट आली आणि बरेचसे म्युच्युअल फ्रेंड लिस्टमध्ये दिसल्याने लोकांनी तिला आपलं फ्रेंड बनवलं.नंतर याच प्रोफाइलवरुन एक मेसेज मुलांना गेला. कोरोनाग्रस्तांना मदत करण्यासाठी याच अकाऊंटतर्फे मुलांकडे पैसे मागितले गेले, सोबत बँक डिटेल्ससुद्धा दिले होते.
शिवाय ही कुणी खरी मुलगी आहे आणि खूप भावनिक होऊन ती आपल्याशी बोलत आहे आणि कित्येक गरजू लोकांना ती मदत करू इच्छिते, असं समजून कित्येक लोकांनी तिच्या दिलेल्या खात्यात ५०, १००, ५०० पासून अगदी ५०००० रुपयांपर्यंत मदत केली!.आता असं समोर आलं आहे की अशी कुणी मुलगी नाही तर ते एक फेक प्रोफाइल होतं ज्यांचा मूळ उद्देश होता लोकांकडून आणि खासकरून मुलांकडून पैसे लुबाडायचे.
अँजल प्रिया म्हणजे काय?
अनेकदा चेष्ठा कीव मस्करी करण्यासाठी मुले , मुलींचे सोशल मीडियाचा वापर करून मुलांशी जवळीक निर्माण करतात. तुमचा मित्र, तुमचा कामकरणाऱ्या कंपनी तील सहकारी, तुमच्या सोबत तोंड ओळख असणारा कोणताही मुलगा आपण मुलगी असून आपल्याशी संवाद साधत असतो. आता मुलगी म्हटली की अनेक तरुण त्यांच्यावर भुलून जातात. आणि आपले हसू कीवा आर्थिक फसवणूक स्वतः च्या हाताने घडवून आणतात.
अँजल प्रिया कशी ओळखावी?
१. अनेकदा आपल्या मित्रांच्या फ्रेंड लिस्ट मध्ये कॉमन आहे अशी मुलीची प्रोफाइल आपल्याला मेसेज करून बोलते तर लगेच भावनिक रित्या वाहून जाऊ नका.मित्रांना त्या मुलिविषयी विचारपूस करून वेळीच सावध व्हा.
२. प्रोफाइल पिक्चर पाहूनच आपण, समजू शकतो की ते प्रोफाइल फेक आहे की नाही. प्रोफाइल फोटो, अनेकवेळा कुठल्याही अभिनेत्री, कार्टून, आणि इतर डिजिटल प्लॅटफॉर्म वापरून असलेली फोटो कदाचित अँजल प्रिया राहू शकतात.
३. मोबाईल रिचार्ज, पैसे मागणे, किव्हा वेगवेगळ्या लिंक्स पाठवून पैश्यांची मागणी असेल तर लवकरच सावध व्हा.
४. मैत्री च्या नावाखाली वैयक्तिक माहिती कोणालाही देणे टाळा.
५. भावनेवर वेळीच ताबा मिळावा आणि, सावधानगिरी ने सोशल मीडियावर वावरा.
नाहीतर अशा आणखीन किती स्नेहा भोसले,अँजल प्रिया या फेसबुकवर अॅक्टिव आहेत कुणास ठाऊक, अगदी या पोस्ट मध्ये म्हंटल्याप्रमाणे “एक मैत्रीण म्हणून जवळ आली आणि लोकांना कित्येक हजारांचा चुना लावून गेली”!. काही Heart breaker,smart boy, मम्मीचालाडका, इंजिनिअर,डॉक्टर.असे नाव प्रोफाइल ला लावण्यापेक्षा स्वतः स्मार्ट होऊन फसवणूक टाळा.