श्रीलंका विरुद्ध बांगलादेश यांच्यात खेळल्या गेलेल्या रंगतदार सामन्यात श्रीलंकेने बांगलादेश वर २ गडी राखून रोमहर्षक विजय मिळवला.
तत्पूर्वी श्रीलंकेने टॉस जिंकून बांगलादेशला फलंदाजी साठी आमंत्रित केले. बांगलादेशने २० षटकात १८३ रन्स ७ बाद अशी विशाल धावसंख्या उभी केली.
विजयासाठी मिळालेल्या १८४ धावसंख्येचा पाठलाग करताना श्रीलंकेने चांगली खेळी करत डाव चालू ठेवला असता. कुशाल मेंडिसने संघासाठी सर्वोच्च ६० धावा केल्या नंतर झेलबाद झाला.
नंतर मधलीफळी कर्णधार दासून शनाका याने पार करीत ४५ धावावर बाद होताच निसटत्या विजयावर शेवटच्या षटकांमध्ये अशिथा फर्नांडो ने ३ चेंडूत २ चौकारासह १० रन्स करीत संघासाठी विजय मिळवून दिला.
सामनावीर कुशाल मेंडिस ठरला. कुशाल मेंडिसने संघासाठी ३७ चेंडूत ६० धावा केल्या.
या सोबतच बांगलादेशचे आशिया कप २०२२ चे स्वप्न साखळी सामन्यातच संपूष्टात आले. तर श्रीलंका या विजया सोबतच पुढील फेरी सुपर ४ साठी ब गटातून अफगाणिस्तान सह पात्र झाला.
यूएई मध्ये खेळताना १८४ या मोठ्या धावसंख्येचा प्रथमच यशस्वीपने पाठलाग करण्यात आला .
तसेच या एवढ्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करीत विजय मिळवण्याची श्रीलंकेची ही दुसरी वेळ असून या पूर्वी सुद्धा श्रीलंकेने बांगलादेश विरुद्धच मीरपूर मध्ये १९४ धावसंख्येचा पाठलाग केला होता.