“राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचं लक्षात घेऊन, 12 एप्रिल 2021 रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या बैठकीत दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय झाला होता.” “महाराष्ट्राच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावीच्या परीक्षा रद्द करण्याची मागणी केली होती.
त्यानुसार दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचं ठरलं,” असं राजेश टोपे म्हणाले.बारावीच्या परीक्षा मात्र होणार आहेत, अशी माहितीही राजेश टोपे यांनी दिली. आरोग्यमंत्र्यांच्या या घोषणेनंतर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबतच्या माहितीची व्हीडिओ ट्विटरवरून शेअर केला आणि त्यांनी सांगितलं.
“आता शालेय शिक्षणाच्या माध्यमातून आम्ही निर्णय घेतोय की, दहावीच्या परीक्षा रद्द करून, अंतर्गत मूल्यांकन करून ते पुढे कसे गेले पाहिजे, याबाबत आम्ही चर्चा करू. ज्या विद्यार्थ्यांना जास्त गुणांची अपेक्षा असेल, त्यांच्याबाबतही भविष्यात निर्णय घेऊ. सर्व बोर्डात समानता असावी, म्हणून शालेय शिक्षणाच्या माध्यमातूनही आम्ही हा निर्णय घेत आहोत,” असंही वर्षा गायकवाड म्हणाल्या.
या पाहिले CBSE, ICSE च्या १० व्या वर्गाच्या परीक्षा सुद्धा रद्द करण्यात आल्या आहेत. आता पाहूया की १२ वी च्या परीक्षांचं काय होईल ते.