“नवरा माझा नवसाचा” मराठी सिनेमा आपण बघितलेलाच असेल, एक पत्नी आपल्या पतीचे भाग्य उजवळविण्यासाठी गणेशाला केलेला नवस कसा पूर्ण करते आणि मग सिनेमात अनेक अतरंगी पात्र येऊन आपले मनोरंजन करतात. अश्याच प्रकारे औरंगाबादच्या या यात्रेला औराळा परिसरातील जेहूर, चापानेर, बोलठाण व हतनूर परिसरासह मराठवाड्याचा काही भाग आणि नाशिक जिल्हा व पूर्ण खान्देशातील भाविकांची गर्दी असते.
औरंगाबादच्या कन्नड तालुक्यातील औराळा गावात लक्ष्मीदेवीच्या यात्रेच्या निमित्ताने पाहायला मिळते. नवसाला पावणारी देवी, अशी धारणा असल्याने नवस केलेल्या महिलांनी मंदिराजवळील दोरखंडाच्या झोक्याला उलटे लटकणे अशी ही अजब प्रथा दरवर्षी यात्रेच्या निमित्ताने बघायला मिळते.
कसं फेडायच नवस गं देवी…
औपंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील औराळा येथील लक्ष्मीदेवी यात्रेला परंपरेनुसार चैत्रशुद्ध नवमी दिवशी सुरुवात होते. यावेळी मानकऱ्यांच्या हस्ते लक्ष्मीदेवीच्या गाड्याची पूजा केली जाते. पूजेनंतर तो गाडा मंदिरापर्यंत वाजत गाजत ओढून आणण्यात आणले जाते. लक्ष्मीदेवी ही नवसाला पावणारी देवी आहे अशी तिच्या भक्तांमध्ये धारणा आहे. या धारणेला अनुसरूनअ नवस केलेल्या महिलांना मंदिराजवळील दोरखंडाच्या झोक्याला उलटे लटकवणे अशी प्रथा आहे.
गेले दोन वर्ष कोरोनाची परिस्थिती आणि प्रशासनाकडून लादण्यात आलेले निर्बंध पाहता ही यात्रा भरलीच नव्हती. पण यावेळी कोरोनाची परिस्थिती आटोक्यात असल्याने आणि प्रशासनाने सार्वजनिक कार्यक्रम भरवण्यासाठी परवानगी दिल्याने तब्बल दोन वर्षांनी औराळा येथील यात्रा भरली आहे. त्यामुळे भाविकांची गर्दीही मोठ्याप्रमाणात पाहायला मिळाली. मराठी Shout ची टीम असल्या कुठल्याही प्रकारचे अंधश्रद्धे ला मानत नाही, आणि वाचकांनाही आवाहन करते की असे करू नये.