चेन्नई : अनेक तरुणांचे भन्नाट स्वप्ने असतात त्यात महागड्या गाड्या विकत घेऊन फिरणे हे ही एक असंच काहीसं स्वप्न तमिळनाडूच्या सालेम येथील तरुणाने आपले स्वप्न सत्यात आणले. आपल्या स्वप्नातील गाडी खरेदी करण्यासाठी या तरुणाने पैसे साठवले आणि शनिवारी त्यानी १ रुपयाची २.६ लाख नाणी शोरूममध्ये जमा करून ही दुचाकी खरेदी केली. हे पैसे मोजण्यासाठी शोरूममधील कामगारांना तब्बल १० तास लागले.
View this post on Instagram
पै पै पैसा साठविला आणि स्वप्न सत्यात आणले.
स्वप्न बघणे आणि सत्यात साकारता आणणे कठीण होते पण व्ही. भूपथी नावाच्या या २९ वर्षीय तरुणाने बजाज डोमिनार ४00 खरेदी करण्यासाठी रोख रक्कम जमा करण्याकरता तीन वर्ष पैसे वाचवले आणि बचत केली. मंदिरे, हॉटेल्स आणि चहाच्या स्टॉलवर मिळालेली सुट्टी एक रुपयांची सर्व नाणी त्याने खर्च न करता जमा करून ठेवण्यास सुरुवात केली. या तरुणाचे स्वप्न सत्यात आले खरे, मात्र ते पैसे मोजणारे यांना खरा मानाचा मुजरा द्यायला हवा असे मराठी Shout च्या टीम चे म्हणणे आहे.