मुंबई : ICC T20 WORLD CUP 2021 हा अत्यंत निराशाजनक ठरला आहे. काही चुकांमुळे भारताला पहिले दोन सामने गमवावे लागले व उपांत्य फेरीपूर्वी भारताचे आव्हान संपुष्ट आले . भारताला पाकिस्तान आणि न्यूझीलंडकडून पराभवाचा सामना करावा लागला. 2022 मध्ये आणखी एक T20 विश्वचषक येत असला तरी. पुढच्या वर्षी अधिक चांगली कामगिरी करण्यासाठी भारतीय संघाला त्यांच्या चुकांमध्ये सुधार करावे लागतील. त्यामुळे काही कठोर निर्णय घेणे आवश्यक आहे.
अनेक खेळाडू 2022 मध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषकात मुकणार आहेत. कोणते तीन खेळाडू आहेत जे यामध्ये सहभागी होणं कठीण आहे यावर आपण एक नजर टाकूया
- हार्दिक पंड्या (Hardik pandya)
हार्दिक पंड्या हा भारतातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंपैकी एक आहे. त्याच्यासारखा स्फोटक ऑल राउंडर खेळाडू क्वचितच भारताला सापडेल. मात्र, त्याच्या फिटनेसवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हार्दिकने केवळ बॅटनेच नव्हे तर गोलंदाजीनेही अनेकदा भारताला सुरुवातीच्या सामने जिंकण्यास मदत केली, परंतु पाठीवर शस्त्रक्रिया झाल्यानंतर तो गोलंदाजी करू शकला नाही.
आयपीएल 2021, टी-20 वर्ल्ड कपमध्येही हार्दिक गोलंदाजी करू शकला नाही. तसेच, शार्दुल ठाकूर आणि हर्षल पटेल सारखे खेळाडू संधीची वाट पाहत आहेत, जे केवळ बॅटनेच नव्हे तर चेंडूनेही अप्रतिम कामगिरी करतात. जर हार्दिकने स्वत:ला तयार केले नाही तर तो पुढील टी-20 विश्वचषकातून बाहेर पडेल.
- वरुण चक्रवर्ती (Varun chakravarthy)
ICC T20 वर्ल्ड कप 2021 सुरु होण्यापूर्वी वरुण चक्रवर्ती हा खूप चर्चेत होता व भारताचा नवा मिस्ट्री स्पिनर मानला जात होता. मात्र या विश्वचषकात त्याला सर्वोत्तम कामगिरी करण्यात अपयश आले. त्याला खेळण्याची संधी मिळाली मात्र त्याला एकही विकेट घेता आली नाही.
चक्रवर्तीने आतापर्यंत एकूण 6 आंतरराष्ट्रीय टी-20 सामने खेळले , परंतु त्याच्या नावावर फक्त 2 विकेट आहेत. त्याला पुढील टी-20 विश्वचषकात स्थान मिळवायचे असेल, तर त्यांना उर्वरित वेळेत चांगली कामगिरी करावीच लागेल
- भुवनेश्वर कुमार (Bhuvaneshwar Kumar)
भुवनेश्वर कुमार हा वरिष्ठ वेगवान गोलंदाज आहे. 2021 च्या टी 20 विश्वचषकातही त्याच्याकडून भरपूर आशा होत्या. भुवनेश्वरला पाकिस्तानविरुद्धचा सामना देण्यात आला होता, पण त्याने 3 षटकात 25 धावा दिल्या आणि त्याला एकही विकेट नाही मिळाली. यानंतर त्याला खेळातून वगळण्यात आले.
भुवनेश्वरचा हा शेवटचा टी-20 विश्वचषक होता असे दिसते जरी तो अनेक वर्षांपासून संघाचा महत्त्वाचा खेळाडू आहे. टी-20 गोलंदाज म्हणूनही त्याची आधीची कामगीरी चांगली आहे आहे. पण गेल्या काही काळापासून तो फॉर्ममध्ये दिसत नाही तसेच भुवनेश्वरचे आयपीएल 2021 देखील फारसे खास नव्हत तसेच, डेथ बॉलर म्हणून त्याचे कौशल्य बर्याच प्रमाणात कमी झाले आहे असे दिसून येत.
आवेश खान, अर्शदीप सिंग आणि हर्षल पटेल, दीपक चहर सारख्या अनेक प्रतिभावान वेगवान गोलंदाज संधी साठी वाट पाहत आहे, त्यामुळे भुवनेश्वर कुमारसाठी टी 20 2022 चा मार्ग अतिशय खडतर आहे.