हल्ली हेल्थकेअरचे वेगवेगळे प्रॉडक्ट्स बाजारात येत असतात. परंतु त्यांच्या नियमित सेवनाने काही काळ आपले शरीर सुदृढ दिसते परंतु अचानकपणे काही हेल्थ केअर प्रॉडक्ट्सचे सेवन करणे बंद केल्यास आपल्या शरीरावर त्याचा वाईट परिणाम झालेला दिसून येतो. त्याला आपण साईड इफेक्ट म्हणत असतो. परंतु असे केमिकल, कृत्रिमरीत्या आणि शरीरास हानिकारक हेल्थकेअर प्रॉडक्ट्स न घेता काही पोषक घटकांचे सेवन केले तर अर्थिक नुकसानासोबत शारीरिक इजा देखील होणार नाही. आपल्याला आपले सुडौल शरीर बनवल्यासाठी तसेच सुंदर दिसण्यासाठी कुठेही बाहेर जायची गरज नाही तर हे उपाय आपण घरी अगदी सोप्या पद्धतीने करणार आहोत. ते म्हणजे ड्रायफ्रूट्सचे योग्यरीत्या सेवन करून. मग चला तर आज आपण असे काही गुणकारी आणि घरगुती ड्रायफ्रूट्सविषयी जाणुन घेणार आहोत जे वाचल्यावर तुमचा खरचं विश्वास बसेल. आणि म्हणूनच तुमच्यासाठी हा लेख फार महत्वाचा आहे. मग चला तर जाणून घेऊया पहिल्या गुणकारी ड्रायफ्रूटबाबत.
पिस्ता :-

यात चांगल्या प्रकारचे स्निग्ध पदार्थ, प्रथिने, तंतुमय पदार्थ असतात. डोळ्यांचे विकार, मधुमेह, हृदयविकार, मलबद्धता, कोलेस्टेरॉलच्या तक्रारी अनेक व्याधींमध्ये उपयोगी आहे. तसेच पिस्त्याचे नियमित सेवन केल्यास त्वचा निरोगी राहण्यास मदत करते.
काळ्या मनुका:-

भिजवलेले काळे मनुके खाल्ल्याने पोटाच्या समस्यांवरही मात करता येते. सकाळी सर्वात आधी पाण्यात भिजवलेले मनुके खाल्ल्यास पोटाशी संबंधित समस्या दूर होतात आणि अँसिडिटीपासूनही मुक्ती मिळते. तसेच भिजवलेले काळे मनुके पाण्यासकट चावून खाल्ल्यास जलदगतीने त्वचा उजळण्यास मदत करते.
अक्रोड :-

याला बुद्धीचे खाद्य म्हणून ओखळले जाते. ओमेगा-३ नावाचे चांगले स्निग्ध पदार्थ यात असतात. अस्थमा, संधीवात, सोरायसिस, निद्रानाश, मलबद्धता, कर्करोग, अल्झमायर इत्यादी विकारांमध्ये उपयोगी.
अंजीर :-

अंजीर हे अतिशय चविष्ट ड्रायफ्रुट्सपैकी एक आहे. त्यामध्ये फक्त फायबरच नाही तर फॅट, कोलेस्टेरॉलही असते. पण अंजीर नेहमी भिजवून खावं कारण अंजीर भिजवून खाल्ल्याने हाडे मजबूत होतात.
खजूर :-

खजूरमध्ये मोठ्या प्रमाणात लोह आणि जीवनसत्त्वे असतात. खजूरामध्ये लोह, पोटॅशिअमचे प्रमाण देखील जास्त असतं. त्यामुळे शरीरातील रक्त पुरवठा सुरळीत राहतो. त्यासोबतच भिजवलेल्या खजूरांनी तुमचं हृदयही निरोगी राहण्यास मदत होते.
बदाम :-

अनेकजण बदाम तसेच खातात मात्र तुम्ही तेच बदाम भिजवून खाल्ले तर त्यातील व्हिटॅमिन-ई आणि अँटीऑक्सिडंट शरीराला मिळतात. भिजवलेल्या बदामांनी तुमची त्वचा चमकदार आणि निरोगी बनते. त्यामुळे तुम्ही फक्त भिजवलेले बदाम खावेत.