भारतात टिकटॉकचे ११.९ कोटीहून अधिक ग्राहक आहेत. अमेरिकेत अडीच कोटीच्या आसपास ऍक्टिव्ह यूजर्स आहेत. अमेरिकेपेक्षा तिप्पट टिकटॉक यूजर्स भारतात आहेत. भारतातील सगळ्यात झपाट्याने वाढणारं ऍप किंवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म म्हणून टिकटॉक ने जम बसवायला सुरुवातही केली होती. टिकटॉक वर बंदी आली आणि आता यासाऱ्यला ब्रेक लागला आहे.
मात्र टिकटॉकवर असणारे कोण आहेत हे टिकटॉकर्स?
लोकडाऊननंतर शिल्पा शेट्टी आणि इतर सेलिब्रिटीजने आपला मोर्चा टिक टॉक कडे वळवला असला तरी टिकटॉक दया अथनि प्रसिद्ध केलं ते या देशातल्या ग्रामीण आणि निम्न मध्यमवर्गीय तरुण-तरुणींनी. इंडिया आणि भारतातला भेद सोशल मीडियामध्येही मोठ्या प्रमाणावर बघायला मिळतो.
त्यातच टिकटॉक हे ‘भारता’चं माध्यम बनलं. ज्यांना, फाडफाड इंग्रजी बोलता येत नाही, ज्यांच्याकडे व्हिडिओ बनवण्यासाठी हातातल्या स्मार्ट फोनव्यतिरिक्त इतर कुठलंही साधन नाही, ज्यांना त्यांच्या भावना, विचार शब्दात नीटपणे मांडता येत नाहीत.
ज्यांना त्यांच्या भाषेचा न्यूनगंड आहे. आपल्या लिखित भाषेवर लोक हसतील असं ज्यांना वाटतं, ज्यांना शब्दांपेक्षा व्हिज्युअल्स अधिक जवळची वाटतात त्यांनी टिकटॉक हे माध्यम चटकन स्वीकारलं. अभिव्यक्तीचं ते सगळ्यात सहज, सोपं आणि आकर्षक माध्यम ठरलं.
फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर यांसारख्या माध्यमांकडे वळण्याऐवजी हे तरुण-तरुणी टिकटॉककडे गेले ते याच कारणाने. कारण, टिकटॉकवर कुणीही आपल्याला जज करणार नाही, आपल्या व्हिडिओवरुन भेदभाव करणार नाही असं त्यांना वाटत होतं. म्हणूनच टिकटॉकचा पसारा झपाट्याने वाढत गेला.
इतका की कालपर्यंत इन्स्टावर असण्यात अप मार्केट वाटून घेणारी तरुणाईही झपाट्याने टिकटॉककडे आली.
त्यांच्यापाठोपाठ सेलिब्रिटिज आणि त्यापाठोपाठ वेगवेगळे ब्रॅण्ड्स. टिकटॉकवर सुरुवातील फक्त मिम्स होते, मग हळूहळू त्यात बास ड्रॉप्स, लीप सिंक्स, ब्यूटि आणि डेटिंग टिप्स या गोष्टी अॅड झाल्या. गेल्या काही वर्षात विनोदी व्हिडिओंपासून सिरिअस विषयांपर्यंत टिकटॉकचा वापर यूजर्स करायला लागले.
१५ सेकंदात तुमच्यातलं टॅलण्ट दाखवणं, एखादा विषय मांडणं, क्रिएटिव्हली गोष्ट समोरच्यापर्यंत अचूकपणे पोहोचवणं ही अर्थातच वाटते तितकी सोपी गोष्ट नाही.
अर्थात टिकटॉकवर सगळंच आलबेल होतं अशातला भाग नाही. वाढण्याच्या प्रचंड वेगात टिकटॉक सॉफ्ट पोर्नकडे झुकलं होतं. त्यावरुन काही काळासाठी टिकटॉकवर बंदीही आली होती, त्यातून वाचण्यासाठी आणि भारतात पसारा वाढता राहावा यासाठी टिकटॉकने त्यावेळी ६0 लाख पोस्ट्स डिलीट करुन टाकल्या होत्या. इतकंच नाही तर आपली चिनी मुळं व्यवसायाला त्रासदायक ठरतायेत असं लक्षात आल्यानंतर त्यांनी त्यांचा सीईओ बदलला होता.
टिकटॉकर्स आणि यू-ट्यूबर्स यांच्यात व्हच्य्युअल वॉर झालं आणि प्ले स्टोअरमध्ये भारतीय यूजर्स निगेटिव्ह कमेंट्सचा मारा केला. तेव्हा गुगलने टिकटॉकची बाजू घेत निगेटिव्ह कमेंट्स डिलीट करून अॅपचं रेटिंग ४च्या खाली उतरणार नाही याची काळजी घेतली होती.
टिकटॉकर्स आणि यू-ट्यूबर्स यांच्यात व्हच्र्युअल वॉर झालं आणि प्ले स्टोअरमध्ये भारतीय यूजर्सनी निगेटिव्ह कमेंट्सचा मारा केला. तेव्हा गुगलने टिकटॉक बाजू घेत निगेटिव्ह कमेंट्स डिलीट करुन अॅपचं रेटिंग च्या खाली उतरणार नाही याची काळजी घेतली होती.
टिकटॉक डेटा चोरत होतं का?
टिकटॉक आयओएस आणि अँड्रॉइड सिस्टीम 1 क्लीपबोर्डस अॅक्सेस करत होते. दर काही सेकंदानी यूज़र्स च्या क्लिपबोर्ड ला पिंग करत होतं.
म्हणजेच दर १ ते ३ किस्ट्रोक्सनंतर टिकटॉक युजर्सचा डेटा घेत होतं.
यात फोन हार्डवेअर डेटा, म्हणजे हॅण्डसेट मॉडेल नंबर, स्क्रीनचा आकार, मेमरी या गोष्टींचा समावेश होता.
फोनमधल्या इतर Apps डेटाही टिकटॉक गोळा करत होतं. इतकंच नाही तर फोनमधून डिलीट केलेल्या अॅप्सचा डेटाही टिकटॉक गोळा करत होतं.यात आयपी,लोकल आयपी.जीपीएस डेटा अशा काही गोष्टी होत्या.
टिकटॉक असे काही कोड वापरात होतं ज्यामुळे फोर्स डाउनलोड आणि अनझिपिंग आणि रिमोट झिप फाइल्स स्न होत होत्या. ज्यामुळे आयओएस १४ मध्ये एक नवीन फिचर अॅड करण्यात आलं आहे. ज्यात थर्ड पार्टी अॅप्सने सिस्टीम क्लीपबोर्डमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला की पॉप अप नोटिफिकेशन येतं.