राणादा आणि पाठकबाई या जोडीनं चाहत्यांना सुखद धक्का दिला खरा पण राणादा म्हणजे हार्दिक जोशीनं २ वर्षांपूर्वीच अक्षया देवधरसोबतच्या नात्याचे संकेत एका सोशल मीडिया पोस्टमधून दिले होते. सध्या त्याची हीच पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय जोडी राणादा आणि पाठकबाई म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधर ही जोडी लवकरच खऱ्या आयुष्यात लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. नुकताच या दोघांचा साखरपुडा पार पडला.
‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतून प्रेक्षकांच्या घरा-घरात पोहोचलेल्या राणादा आणि पाठकबाई म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांचा साखरपुडा नुकताच पार पडला. छोट्या पडद्यावर लोकप्रिय ठरलेल्या या जोडीनं त्यांच्या रिअल लाइफची नवी इनिंग सुरू करत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. रणादा ने ‘रिंग सेरीमनी’ केली अशी काही हटके की सगळीकडे याचेच कौतुक होताना दिसते.
View this post on Instagram
‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतून प्रेक्षकांच्या घरा-घरात पोहोचलेल्या राणादा आणि पाठकबाई म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांचा साखरपुडा नुकताच पार पडला. छोट्या पडद्यावर लोकप्रिय ठरलेल्या या जोडीनं त्यांच्या रिअल लाइफची नवी इनिंग सुरू करत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे.
View this post on Instagram
दरम्यान ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या राणादा आणि पाठकबाईंच्या जोडीला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं होतं. दोघंही अनेकदा सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो शेअर करताना दिसले होते. त्यांच्यातील खास बॉन्डिंगची चर्चा अनेकदा सोशल मीडियावर झाली होती.