प्रत्येकाला वाटतं की, त्यांचा रूममेट हा चांगला असावा आणि त्याच्यासोबत चांगली बाँडिंग व्हावी. मात्र नेहमीच प्रत्येकाला चांगला वा चांगली रुममेट मिळत नाही. त्यामुळे एका व्यक्तीने आपल्या सोबत राहण्यासाठी रुममेटची जाहिरात काढली आहे.या व्यक्तीने रूममेटसाठी अनोखी मागणी ठेवली आहे. जी पाहून अनेकजणं हैराण झाले आहेत.
सध्या या जाहिरातीचा फोटो व्हायरल होत आहे. रस्त्याच्या एका खांबाला ही जाहिरात लावण्यात आली आहे. जाहिरातीत ४४ वर्षीय ओवन नावाची व्यक्तीने सोबत राहण्यासाठी रूममेटची वॅकेन्सी काढली आहे. यासह त्याने रूममेटसाठी अनेक मागण्या ठेवल्या आहेत.
ही आहे मुलींच्या वयाची अट, आणि दुसऱ्या अनेक अटी…
जाहिरातीत लिहिलं आहे की, तो सिंगल आहे आणि १८ ते २५वर्षांच्या महिला रुममेटच्या शोधात आहे. त्याने जाहिरातीत पुढे लिहिलं आहे की, तिच्या रूममेटला स्वयंपाक करावं लागेल आणि घराची साफसफाईही करावी लागेल. धक्कादायक म्हणजे घरात केवळ एकच बेडरूम आहे. महिला रूममेटला त्याच्यासोबत बेड शेअर करावा लागेल.
मात्र पुढे असंही लिहिलं आहे की, जोपर्यंत महिला त्याच्यासोबत बेड शेअर करण्यासाठी तयार होत नाही तोपर्यंत ती सोफ्यावर झोपू शकतो. त्याशिवाय ती मित्रांना घरी आणू शकत नाही. या अटी पाहून लोक हैराण झाले आहेत. भयंकर म्हणजे बाथरूमला जातानाही रुममेटला दार उघडं ठेवावं लागेल. अश्या विकृत माणसासोबत राहणे किती योग्य आहे. अश्या अनेक अतरंगी अटी पूर्ण करण्यापेक्षा दुसराच राहण्याचा पर्याय मुलींनी शोधावा असे मराठी Shout चे मत आहे.