मुंबई : T-20 वर्ल्ड कप 2021 मध्ये भारताचे आव्हान उपांत्य फेरीपूर्वीच संपुष्टात आले. पाहल्या दोन सामन्यात भारताची कामगिरी अत्यन्त साधारणकारक होती त्यामुळे टीम इंडियाला पराभव पत्करावा लागला. स्पर्धेतील गट सामन्यांमध्ये पराभूत झाल्यानंतर टूर्नामेंटमधून बाहेर पडल्यानंतर टीम इंडियामध्ये मोठे बदल करण्यात आले . टी-20 वर्ल्डनंतर विराट कोहलीने टी-20 मधील भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधारपद सोडले त्यामुळे विराट कोहलीच्या जागी रोहित शर्माला T20 चा नवा कर्णधार बनवण्यात आले.
बीसीसीआय विराट कोहलीच्या वनडे कर्णधारपदाच्या भविष्याबाबत लवकरच निर्णय घेऊ शकते.2023 मध्ये होणाऱ्या एकदिवसीय सामनाच्या वर्ल्डकपपूर्वी बीसीसीआयला टी-20 आणि एकदिवसीय क्रिकेटकरिता एकच कर्णधार हवा अशी इच्छा आहे त्यामुळे कोहलीच्या वनडे कर्णधारपदाच्या भवितव्याबाबत लवकरच मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) वरिष्ठ अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितलं की, “मला खात्री नाही की बीसीसीआय विराटला वनडे कर्णधार म्हणून कायम ठेवणार नाही. याची शक्यता फारच कमी असल्याची चर्चा आहे. तो यापुढे कसोटी कर्णधार असेल मात्र एकदिवसीय आणि T-20 क्रिकेटसाठी फक्त एकच कर्णधार हवा आहे आणि त्यासाठी योग्य वेळ आल्यावर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेबाबत हा निर्णय घेतला जाईल.”
रोहित शर्माची T20 कर्णधार म्हणून निवळ करण्यात आली ही फक्त एक औपचारिकता होती, तर लोकेश राहुल उपकर्णधार असेल. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, “जेव्हा रोहित शर्मा उपलब्ध असेल, तेव्हा दुसरा पर्याय नाही. तसंच लोकेश राहुल उपस्थित आहे, पण सध्या उपकर्णधारपदासाठी त्याच्या नावाचा विचार केला जाईल. अर्थात रोहित जेव्हा ब्रेक घेतो तेव्हा राहुल टीम इंडियाचे नेतृत्व करेल.”
17 नोव्हेंबरपासून टीम इंडिया व न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या तीन सामन्यांची टी-20 टीम ची घोषणा झाली आहे यात विराट कोहलीसोबत जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमीसारख्या वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. IPL 2021 मध्ये सर्वाधिक धावा करणारा ऋतुराज गायकवाड आणि सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू हर्षल पटेल तसेच आवेश खान यालाही भारताच्या 16 सदस्यीय संघात स्थान देण्यात आले आहे.