व्हॉट्सअॅपने एक नवीन फीचर आणले आहे, ज्यामुळे आता युजर्सला त्यांचा चॅट सुरक्षित ठेवता येईल.आपल्याला जर कोणासोबत संभाषण करायचे असल्यास आपण व्हाट्सएपचा नेहमी वापर करतो. परंतु या आपल्या डिजिटल संभाषणात दोन व्यक्तीतली चॅट हे पुरावा म्हणून प्लॅटफॉर्म वर स्टोअर्स असते.
आपण नेहमी आपल्या समोर असलेल्या व्यक्तीसोबत देखील समोरासमोर संभाषण न करता डिजिटल पद्धतीने व्हाट्सएप चा वापर करत असतो . परंतु जी मज्जा समोरासमोर गप्पा मारण्यात आहे, ती डिजिटल पद्धतीने गप्पा मारण्यात नाही. तसेच समोरासमोर बोललेली गोष्ट ही त्या दोन व्यक्तींमध्येच गुपीत राहू शकते मात्र जर आपण डिजिटल प्लॅटफॉर्मवरती एकमेकांना सांगितली, तर त्याचा पुरावा मागे राहतो. ज्यामुळे कोणतीही तिसरी व्यक्ती त्याला वाचू शकते. त्यामुळे आपण मनमोकळे व्हाट्सएप वर बोलू शकत नाही.
व्हॉट्सअॅप आपल्या ग्राहकांना चांगली सेवा देण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतो आणि नवनवीन फीचर्स अॅड करत असतो. व्हॉट्सअॅपचे जगभरात लाखोंपेक्षा जास्त युजर्स आहेत.
आता WhatsApp ने एक नवीन फीचर ऍड केले आहे, ज्यामुळे युजर्सला त्यांचा गप्पा सुरक्षित ठेवण्याचा पर्याय देण्यात आला आहेWhatsApp चे अशे म्हणणे आहे की, अॅपवर किती काळ मेसेज असायला पाहिजे हा आता तुमचा निर्णय असायला पाहिजे . जेव्हा युजर्स कोणालाही संदेश पाठवतो किंवा प्राप्त करतात तेव्हा त्या संदेशांची डिजिटल प्रत तयार होते आणि आम्हाला त्याबद्दल माहिती देखील नसते.
म्हणूनच गेल्या वर्षी WhatsApp ने ग्राहकांसाठी डिसअपीयरिंग मेसेज फीचर तसेच व्ह्यू वन्स फीचर आणले होते जेणेकरुन वापरकर्त्याने फोटो किंवा व्हिडीओ पाहिल्यानंतर तो लगेच गायब होईल.
आता WhatsApp ने एक नवीन फीचर आणल , त्यामुळे यूजर्सना त्यांच्या मेसेजवर नियंत्रण मिळवण्यासाठी अधिक पर्याय मिळणार आहे. ‘डिफॉल्ट डिसपिअरिंग मेसेज आणि मल्टिपल ड्युरेशन्स’ या फीचर्सच्या मदतीने युजर्स किती काळ मेसेज ठेवावा हे ठरवू शकेल.
हे नवीन फिचर्स कसे कार्य करते ? | WhatsApp New Features 2022
आता WhatsApp वापरकर्ते त्यांच्या सर्व नवीन चॅटसाठी अदृश्य संदेश मोड सुरू करू शकतात. एखाद्या व्यक्तीसाठी मेसेज किती वेळाने डिसअपिअर होईल हेसुद्धा सेट करता येईल . ही सेटिंग WhatsApp ग्रुपसाठी देखील असेल.हे नवीन फिचर्स तुम्हाला ठेवायचे की नाही हे तुमच्या मर्जीवर असेल जर हे फिचर्स नको हवं असेल तर तुम्ही ते काढून टाकू शकता.
चॅटवर ‘डीफॉल्ट डिसपिअरिंग मेसेजेस’ मोड सक्षम करून ते डीफॉल्ट किंवा एखाद्या वेळेनुसार तुम्ही त्याला वापरू शकाल. WhatsApp वर हा मोड चालू करण्यासाठी प्रायव्हसी सेटिंग्जवर जा आणि ‘डीफॉल्ट मेसेज टाइमर’ निवडा. WhatsApp च्या या ‘गायब होणार्या संदेशांसाठी’ दोन नवीन कालावधी पर्याय दिलेले आहे, आता ते 7 दिवसांव्यतिरिक्त 24 तास आणि 90 दिवसांसाठी सेट केले जाऊ शकतात.
तुम्हाला जर हा पर्याय आवडला तर तुम्ही कोणत्याही WhatsApp चॅट दरम्यान हा पर्याय चालू ठेवू शकता. तसेच, एक चांगली गोष्ट आहे आणि जर तुम्हाला एखादी विशिष्ट चॅट कायमस्वरूपी स्टोअर करून ठेवायची असेल, तर तुम्ही त्या चॅटसाठी हा पर्याय बंद सुद्धा करता येईल.