आपण मार्केटमधून नेहमीच चायनीज शोभेच्या वस्तू जसे की, दिवे, लाइटिंग्स, पाण्याचे दिवे आणि इतर काही इलेक्ट्रॉनिक्स वस्तू ज्या आपण घरी खरेदी करून आणत असतो. परंतु एका अर्थाने आपण परदेशीय चलनाला पाठिंबा देत असल्याचे सिद्ध होते परंतु ह्या चायनीज वस्तू खरेदी न करता पारंपारिक रित्या परंपरेनुसार चालत आलेल्या दिव्यांची रास जर आपण दिवाळीत सुशोभित केली तर नक्कीच त्याचा फायदा आपल्या घरच्यांना होऊ शकतो कारण दिवा लावताना मातीचा दिवा हा महत्त्वाचा मानला जातो. मातीच्या दिव्यामध्ये जेव्हा आपण तेल टाकतो तेव्हा ते तेल शनिदेवाचे प्रतिनिधित्व करते तसेच दिव्याची ज्योत, ज्याने आजूबाजूचा परिसर प्रकाशमान होतो ती ज्योत मंगळ ग्रहाचे प्रतिनिधित्व करते आणि भरपूर काही गोष्टी अशा आपल्या कुंडलीतल्या मुख्यत्वे राहू आणि केतू ग्रहांचा दोष नाहीसा करण्यास मदत करत असतात. हिंदू धर्म आणि परंपरेला अनुसरूनच मातीच्या दिव्यांची आरास लावून सजावट करावी. दिवा म्हणजे स्वतः तेवत राहून आजूबाजूचे परिसर प्रकाशन करणे. अंधारमय जीवनातून प्रकाशाकडे न्यावे अशी प्रेरणा ही ज्योत आपल्याला देते. अर्थात तिमिरातून तेजाकडे.
तसेच दिव्याची जळती ज्योत आपल्याला नेहमी ताठ मानेने जीवन जगण्याची प्रेरणा देते. कितीही कष्ट आले तरी हार न मानता सतत कार्यशील राहण्याची शिकवण ती देते.
दिवाळीच्या रात्री म्हणजेच कार्तिक अमावस्येच्या रात्री घराच्या गच्चीवर दिवे ठेवल्याने घरात नकारात्मक शक्तींचा प्रवेश होत नाही, असे देखील मानतात. एवढच काय तर दिव्यांची ज्योत कुठल्या दिशेने असावी याचेही एक महत्व असते असे मानतात.
जसे की ज्योत पूर्व दिशेने ठेवल्यास दीर्घायुष्य मिळते. दक्षिण दिशेने ठेवल्यास हानी होते. त्यामुळे दिव्यांचे तोंड कधीही दक्षिणेला ठेवू नये. पश्चिम दिशेकडे ठेवल्यास दुखः मिळते, तर उत्तर दिशेकडे ठेवल्याने धन, आरोग्य आणि समृद्धीची प्राप्ती होते.
तसेच दिव्याची ज्योत पेटवल्यानंतर ती विझवणे हे अशुभ मानले जाते. दिवे कधीही फुंकर मारून विझवू नये. हाताने हलवून विझवू शकता. दिव्याला दिवा लावून त्याची ज्योत पेटवणे हे देखील चुकीचे मानले जाते. असे केल्यास घरी आपापसात भांडण, कटकटी निर्माण होतात.
दिवाळीत दिवे कुठे लावावे ?
१.पहिला दिवा देवघरात पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून लावा. तसेच घराच्या मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला लावला जातो, येथूनच देवी लक्ष्मी घरात पहिले पाऊल टाकते. असे मानले जाते की येथे दिवा लावल्याने घरात सकारात्मकता येते, त्यामुळे दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाच्या आधी घराच्या दाराच्या दोन्ही बाजूला तेलाचे दिवे लावावेत.
२. दुसरा दिवा अंगणात काढलेल्या रांगोळीजवळ ठेवावा. येथे दिवा लावल्याने घरातील सदस्यांना समाधान मिळते.
३. लक्ष्मीपूजनाच्या आधी घराच्या मंदिरात 5 कणकीचे, किंवा मातीचे दिवे लावावेत, यासोबतच घराच्या आजूबाजूला मंदिर असेल तर तिथेही दिवा लावावा. असे मानले जाते की यामुळे घरात समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा येते.
४. लक्ष्मीची पूजा करण्यापूर्वी, 4 चारमुखी दिवे, म्हणजे 4 वस्तू ज्यामध्ये 4 वस्तू पेटवता येतील असे दिवे घराच्या चारही कोपऱ्यांमध्ये लावा आणि श्रीगणेशाला सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करा. यामुळे घराला एक संरक्षक कवच मिळते.
५. लक्ष्मीची पूजा केल्यानंतर घरातील तुळशीच्या रोपावर तेलाचा दिवा लावावा. भगवान विष्णूंना तुळशी अत्यंत प्रिय आहे. तुळशीला दिवा लावल्याने घरात पवित्रता आणि शांती राहते.