भारतासह जगभरात कोरोनाच्या व्हेरिएंटने थैमान घातलेलं आहे. कोरणाच्या वेगवेगळ्या व्हेरिएंटमुळे सर्वच देशातील नाकरिक त्रासले आहे. सध्या कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचे रूग्ण काहीशा प्रमाणात कमी होताना दिसत आहेत . मात्र याचदरम्यान जागतिक आरोग्य संघटनेने मोठा इशारा दिला आहे.
जागतिक आरोग्य संघटना WHO चे अशे म्हणणें आहे की, कोरोनाचा पुढचा येणारा नवीन व्हेरिएंट अधिक संसर्गजन्य आणि अधिक जीवघेणा असू शकतो याची शक्यता नाकारता येणार नाही.अनेक तज्ज्ञांच अशे म्हणणे आहे की ओमायक्रॉन हा शेवटचा व्हेरिएंट असेल मात्र डब्ल्यूएचओच्या तज्ज्ञ डॉ. मारिया वान केरखोव यांनी सांगितलं की, कोरोनाची महामारी अद्याप काही संपलेली नाही. त्यामुळे कोरोनाचे यापुढे येणारे व्हेरिएंट ओमायक्रॉन व्हेरिएंटपेक्षा जास्त संसर्गजन्य असतील.
मारिया पुढे म्हणाले की, कोरोनाचा पुढील व्हेरिएंट अधिक संसर्गजन्य असण्याची शक्यता नाकारता येणार नाही त्यामुळे सध्या झालेल्या नुकसानहुन अधिक नुकसान होऊ शकतं.
डॉ. मारिया यांच्या सांगण्यानुसार, कोरोनाचा पुढील येणारा नवीन व्हेरिएंट हा आपली प्रतिकारशक्ती अधिक कमी करू शकतो आणि यावर लसीचा प्रभाव देखील कमी असू शकतो. त्यामुळे येणाऱ्या सर्व परिस्थितीसाठी आपणास सर्वांना सज्ज राहणे गरजेचे आहे आणि नियमितपणे आरोग्याची काळजी घेणे आणि मास्क घालणे व इतर कोरणाच्या अटींचे पालन करणे आवयशक आहे.