हिवाळा म्हटलं की सगळीकडे थंड गार वातावरण असते. खरंतर, उन्हाळ्यात लोक जेवढे उन्हापासून पळतात जेवढे ते हिवाळ्यात उन्हाच्या जवळ राहतात. उन्हाचे आपल्या शरीराला अनेक फायदे होतात. हे तर सगळ्यांनाच माहीत आहे की, सूर्य प्रकाशापासून आपल्याला व्हिटॅमिन डी मिळतं. पण उन्हापासून व्हिटॅमिन डी तुम्हाला केंव्हा मिळतं हे तुम्हाला माहीत आहे का ? असं अजिबात नाही आहे की, तुम्ही जास्त वेळ उन्हात बसल्याने तुम्हाला जास्त फायदा मिळेल. त्यामुळे हे माहीत असायला हवं की, सूर्य प्रकाश कोणत्या वेळी घ्यावा. याने तुम्हाला काय-काय फायदे मिळतात. चला तर मग जाणून घेऊयात हिवाळ्यातील उन्हाचे व्हिटॅमिन डी चे महत्व.
हिवाळ्यात या वेळेत मिळेल व्हिटॅमिन डी
सकाळी – जर तुम्हाला सकाळच्या वेळी व्हिटॅमिन डी घ्यायचं असेल तर सकाळी ८ वाजता तुम्ही २५ ते ३० मिनिटे उन्हात बसू शकता. कारण यावेळी उन्ह कोवळं राहतं आणि व्हिटॅमिन डी अधिक जास्त मिळतं. आणि सायंकाळी जर तुम्हाला सायंकाळी सूर्य प्रकाशापासून व्हिटॅमिन डी घ्यायचं असेल तर तुम्ही सूर्य बुडण्याआधी सूर्य प्रकाशात बसावं.
शरीरास व्हिटॅमिन डी उपयुक्त
सूर्य प्रकाशात थोडा वेळ बसलण्याने तुम्हाला अनेक फायदे मिळतात. यातील सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे व्हिटॅमिन डी. आजच्या काळात अनेक लोकांना व्हिटॅमिन डी ची कमतरता जाणवते. हे व्हिटॅमिन आपल्या शरीराच्या इम्यून सिस्टीमला मजबूत करण्याचं काम करतं. त्याशिवाय आपल्या शरीराला ऊर्जा देतं.
हिवाळ्यात सूर्यप्रकाशाचे फायदे
१) त्वचेच्या आकुंचन, बुरशी आणि इतर त्वचेच्या रोगांसाठी सूर्यप्रकाश नैसर्गिक उपाय आहे. त्वचेतील ओलावामुळे वाढणाऱ्या बॅक्टेरियाचा नायनाट करून त्वचेला निरोगी ठेवण्यात सूर्यप्रकाश फायदेशीर आहे.
२) सूर्य प्रकाशातून शरीराला यूवीए मिळतं. ज्यामुळे आपला रक्त प्रवाह चांगला राहतो. त्याशिवाय याने ब्लड ग्लूकोज लेव्हलही चांगली राहते.
३) हिवाळ्यात स्नायू ताठरतात त्यामुळे सूर्यप्रकाश घेणं फायदेशीर होतं. हे सूर्यप्रकाश शरीराला बाहेरूनच नव्हे तर अंतर्गत अवयवांना देखील उबदारपणा देऊन निरोगी ठेवतात.
४) सूर्यप्रकाशात बसणे मानसिक आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. काविळसारखा गंभीर आजार बरा करण्याची क्षमता सूर्यकिरणांमध्ये असते.
५) जर तुम्हाला झोप येण्यासंबंधी काही समस्या असेल तर तुमच्यासाठी सूर्य प्रकाश फार फायद्याचा आहे. कारण याने तुम्हाला चांगली झोप लागेल. सूर्य प्रकाश मेलाटोनिन नावाचं हार्मोन असतं. ज्यामुळे तुम्हाला चांगली झोप येते.
६) जर तुम्हाला हिवाळ्यात सर्दी पडसे जास्त प्रमाणत होत असेल तर एक प्रभावशाली उपाय तुम्हाला मदत करू शकतो. खरंतर ज्यांना ऍलर्जी, सर्दी, पडसे यांसारखे आजार सर्दीत होतात त्यांनी अर्धा तास तरी हिवाळ्यात सूर्यप्रकाशात अर्धा तास बसावे त्यामुळे शरीरातील थंडपणा, सर्दी ,पडसे, एलर्जी यांसारखे गंभीर आजार त्वरित दूर पळतील.