सामंथाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलताना ती दक्षिण सुपरस्टार नागार्जुनचा मुलगा नागा चैतन्य याची पत्नी आहे. समंथा आणि नागा चैतन्य यांचं लग्न हे बॉलिवूड, टॉलीवूड आणि राजकीय जगातील दिमाखदार लग्नसोहळ्यापैकी एक होतं
ही अभिनेत्री कायमच साधी दिसते पण तरीही ती चाहत्यांचं तिच्या फोटोमुळे लक्ष वेधून घेते.. कायमच तिचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत असतात.
सामंथा अक्किनेनी साउथ इंडस्ट्रीमधील उत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक आहे आणि तिला फॅशन सेन्ससाठी देखील ओळखलं जातं. तिच्या फोटोशूट दरम्यानचा एक मजेदार किस्सा देखील खूप प्रसिद्ध आहे ज्यासाठी सामंथा चर्चेत आली होती.
एका फोटोशूट दरम्यान एका पत्रकाराने तिला एक विचित्र प्रश्न विचारला जो प्रश्न ऐकून सगळेच जण थक्क झाले. प्रश्न असा होता की, जर सामंथाला जेवण किंवा शारीरिक संबंध यातून निवडायचं असेल तर तु कोणाची निवड करशील. हा प्रश्न ऐकून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला, परंतु सामंथाने उत्तर देण्यास टाळाटाळ केली.
सामंथा उत्तर देत म्हणाली की, ती शारीरिक संबंध निवडण्यास प्राधान्य देईल आणि त्यानंतर एक मोठा वाद निर्माण झाला. कारण आपल्या समाजात याबद्दल खुलेआम बोलण आजही वर्ज्य नाही. मात्र सामंथाला बर्याच वादाचा सामना करावा लागला होता. याशिवाय सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकदा अनेक महत्त्वाच्या मुद्दय़ांवर तिने आपलं मत मांडलं आहे.