मोहनलाल यांची मुख्य भूमिका असलेल्या दृश्यम 2 या चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. हा मल्याळम चित्रपट असला तरी अनेक जण सबटायटलच्या मदतीने हा चित्रपट पाहात आहेत.दृश्यम या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगले कलेक्शन केले होते. त्यानंतर या चित्रपटाचे विविध भाषेत रिमेक बनवण्यात आले होते.
हिंदीमध्ये देखील हा चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळाला होता. यात अजय देवगणची मुख्य भूमिका होती. या चित्रपटातील सस्पेन्स लोकांना प्रचंड आवडला होता. त्यामुळे या चित्रपटाचा दुसरा भाग येणार हे कळल्यावर लोकांच्या मनात या चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण झाली होती.
‘ दृष्यम २’ चित्रपटातील कथा:
दृश्यम या चित्रपटाची कथा जेथे संपली होती, तिथून दृश्यम 2 या चित्रपटाची कथा सुरू होते. आपल्या कुटुंबाने केलेल्या मर्डरमधून त्यांना वाचवण्यासाठी नायक पोलिसांना चकवा देतो आणि बांधकाम सुरू असलेल्या पोलिस स्टेशनमध्ये मृतदेह लपवतो असे आपल्याला दृश्यम मध्ये पाहायला मिळाले होते. दृश्यम 2 मध्ये सुरुवातीलाच हाच मृतदेह लपवताना एक माणूस नायकाला पाहतो. पण या माणसाने एका व्यक्तीचा मर्डर केला असल्याने त्याला सहा वर्षांची शिक्षा होते. त्यामुळे सहा वर्षं हे कसे काय लपले राहते. मग त्या माणसाला पोलिसांनी खुन्याला पकडुन दिल्यास देण्यात येणाऱ्या पैस्यांच माहिती पडते. मग लोभामुळे तो खुनी कसा पोलिसांना मदत करतो. शेजारी राहणारे दारुडा त्याची पत्नी कशी पोलिसांना मदत करते. नायकाचे पोलिसांच्या दोन पाऊले पुढे राहणं. आपल्याला शेवटापर्यंत अगदी खिळवून ठेवते. नायक शेवटी पोलिसांच्या हाती लागतो कीवा आपल्या परिवारासोबत सुटून येतो हे चित्रपटातून आपल्याला कळेलच. हा चित्रपट नाट्य, चित्त थरारक अनुभव यासाठी पहावा.