रोजच्या जीवनात आपण बऱ्याच लोकांना भेटत असतो पण भेटताना अप्प्ल्याला आपली सवयींचें भान नसते व आपण अनेक चुका करून बसतो या चुका आपली proffesional life मध्ये खूप महागात पडू शकतात त्यामुळे अश्या काही गोष्टी आहे जे आपल्याला टाळायला हवे,कोणत्या त्या गोष्टी जाणून घ्या सविस्तरपणे.
1. कुठल्याही व्यक्तीचे नाव विसरणे
जेव्हा आपण कुणाला भेटतो तेव्हा सगळ्यात आधी आपण आपला परिचय देतो. आणि आपल्या चांगल्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतो. स्वतः बद्द्ल सांगत असताना आपण एवढे उत्सुक असतो की समोरच्याने सांगितलेले त्याचे नाव आपण विसरून जातो. आणि आपण एकतर त्या व्यक्तीचे नाव चुकीचे उच्चारतो व त्याचे नाव त्याला परत विचारतो. नावाचा गोंधळ करणे हे समोरच्या व्यक्तीवर चुकीचा प्रभाव टाकु शकतो. तर ही चूक समोर करू नका.
2. स्वतःचे डोके खाजवणे व गुप्तांग खाजवणे
कुठल्याही व्यक्तीला भेटताना चुकीच्या ठिकाणे खाजवणे जसे डोके खाजवणे , नाकात बोट लावणे, कानात बोट लावणे आणि नखे खाणे ह्या चुकीच्या सवय असतात ह्या करू नका.
3. शरीराचा किंवा तोंडाचा वास येणे
जेव्हा ही तुम्ही कुठे बाहेर पडत असाल तर लक्षात असुद्या की तुमच्या शरीराची घाण वास तर नाही ना येत आहे किंवा बोलताना वास तर नाही जात आहे. जेव्हा ही घरा बाहेर निघाले तर स्वछ होऊन Perfume वगैरे लावून आणि छान Mouth Wash करून निघा. तुमच्या शरीराचा व तोंडाचा वास दुसर्यांना त्रासदायक ठरू शकतो. तर ही चूक टाळा.
4. Formal or Professional व्यक्तींना भेटताना Casually भेटू नये
बऱ्याच दा आपण कुणाला भेटला जात असतो तर आपण कुणाला भेटला जातोय त्या व्यक्तीचे महत्व काय आहे त्याचे Profession काय आहे याची जाणीव असणे गरजेचे आहे . जर व्यक्ती Professional असेल तर त्याला Casual भेटू नये अश्या व्यक्तींना Formal Dressing करूनच भेटा Impression चांगला पडेल.
5. स्वतःचा परिचय (Introduction) करायच्या आधी विचित्र काही बोलू नये
कुणाला भेटताना व बोलताना आपण सरळ स्ववाद सुरू करतो बऱ्याच दा आपण समोरच्या व्यक्तीला ओडखत सुद्धा नसतो अश्या वेळेला आपण आपला परिचय न देता बडबड करत असतो. समोरच्याला प्रश्न पडतो हा कोण हा का एवढा बोलतोय तर कुणाशी ही बोलताना स्वतःचा परिचय देण्या आधी काही ही बोलणे टाळा. आणि स्पष्ट पणे आपला परिचय द्या.
6. काही खाऊन कुणाशी बोलू नये
जेव्हा ही आपण कुणाला भेटतो किंवा कुणाशी बोलत असतो तर आपन काही ना काही खात असतो. गुटखा , मावा , खर्रा आणि Chewing gum अश्या वस्तू खायची असते. कुणाशी ही बोलत असताना अस काही खाऊन बोलू व काही खात असताना आवाज सुद्धा करू नये ते चुकीचा वाटत.
7. चांगला श्रोता नसणे (Bad Listener)
आपण कुणाशी बोलत असताना सगळ्यात महत्वाचे असते समोरच्या व्यक्तीचे बोलणे समजून घेणे. या साठी तुम्हाला चांगले श्रोते असणे गरजेचे आहे पण बरेच लोक समोरच्या व्यक्ती चा काही न ऐकता स्वतःच बोलत असतात तर अश्या चूक करू नका. समोरच्या च बोलणं पूर्ण पणे एका Good Listener व्हा.
8. नकारात्मक बोलू नये व show off करू नये
आपल्या सवय असते कुणाला ही भेटला तर आपण आपले प्रॉब्लेम सांगत फिरत असतो नेहमी नकारात्मक Negative बोलत असतो किंवा दुसरी आपल्याला सवय असती की माझ्या कडे ही वास्तू आहे माझ्या कडे ही गाडी आहे Show Off करणे तर अश्या गोष्टी कुणा समोर करू नये याची समोरच्या व्यक्तीवर तुमचा चांगला प्रभाव पडत नाही.
Read also :-
लोकांना भेटनाना आपल्याला भान नसते आपल्या सवयींकडे आपले लक्ष नसते या ८ अश्या सवयी जर तुम्ही करत असाल तर ते तुम्हाला महागात पडू शकतात तुमच्या ऑफिस मध्ये आणि तुमच्या जवळच्या मित्रांना किंवा कुणालाही भेटताना अश्या चुका करू नका.जीवनात तुम्हाला एक चांगलं व्यक्तिमत्व बनवायचं असेल तर या चुका तुम्हाला टाळायला पाहिजे.