रतन टाटा म्हटलं की भारताच्या यशस्वी उद्योजकांच्या यादीत त्यांचे हे नाव सर्वश्रेष्ठ समजले जाते. रतन टाटा यांचा जीवन प्रवास फार कमी जणांना माहिती आहे. खरंतर टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा हे केवळ त्यांच्या कर्तृत्वासाठी नव्हे तर त्यांच्या नम्र स्वभावासाठी ओळखले जातात. प्राण्यांप्रती असणारी त्यांची भूतदया सर्वप्रचलित आहेच. टाटा समूहाला नव्या उंचीवर नेणारे रतन टाटा आज करोडो लोकांसाठी प्रेरणास्थानी आहेत.त्याच्या व्यावसायिक यशाबद्दल सगळ्यांनाच माहिती आहे, पण लव्ह लाईफची ओळख फार कमी लोकांना होईल. रतन टाटा यांनी आजपर्यंत लग्न केले नाही, अशा परिस्थितीत अनेकांना असे वाटेल की, जर त्यांना असे कोणी सापडले नाही किंवा कोणत्याही मुलीच्या प्रेमात पडले नाही. पण खरी गोष्ट मात्र वेगळी आहे. सध्या सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये यामध्ये त्यांनी आयुष्याच्या या वळणावर जोडीदार असावा असं वाटतं असं म्हटले आहे. चला तर मग रतन टाटांच्या आयुष्यातील त्या सुंदर विषयाबद्दल माहिती करुन घेऊया.
असे म्हणतात की खरं प्रेम आयुष्यात एकदाच होते आणि त्यानंतर अशी भावना निर्माण होणं अशक्यच असतं. ही गोष्ट काही खोटी नाही रतन टाटा यांच्यासोबतही असेच काहीसे घडले होते, परंतु त्यांचे लग्न होऊ शकले नाही. आपल्या खऱ्या प्रेमासाठी रतन टाटांनी आजतागायत लग्न केले नाही. त्यांच्या तरुण वयात ज्या मुलीवर प्रेम करत होते तिच्याशी ते लग्न करू शकले नाहीत. त्यानंतर त्यांनी कधीही प्रेमाचा शोध घेतला नाही. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य ‘द टाटा ग्रुप’ या कंपनीसाठी समर्पित केले
या कारणाने लग्न करू शकले नाही.
रतन टाटा हे तरुणपणात फारच हँडसम दिसत होते. कित्येक मुली त्यांच्यावर फिदा होत्या. परंतु एवढी श्रीमंती असूनही त्यांनी कोणत्या मुलीला आपली पत्नी का बनवले नाही ? हा सवाल अनेकांना पडला आहे. खरंतर, त्यांनी लग्न का केले नाही ? असा सवाल एका मुलाखतीदरम्यान रतन टाटा यांनी स्वतः खुलासा केला की जेव्हा ते लॉस एंजेलिसमधील आर्किटेक्चर फर्ममध्ये काम करत होते, तेव्हा त्यांना एका मुलीशी भेटले कालंतराने ते तिच्या प्रेमात पडले. त्यावेळी त्यांची लग्न करून सेटल होण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, भारतात सात वर्षांपासून आजारी असलेल्या आजीची काळजी घेण्यासाठी त्यांनी भारतात परतण्याचा निर्णय घेतला. यानंतर रतन टाटा आपल्या मैत्रिणीला भेटण्यासाठी परत गेले आणि तिला आपल्यासोबत भारतात घेऊन जाण्याचा विचार करत होते, परंतु तसे झाले नाही. १९६२ च्या भारत-चीन युद्धामुळे, महिलेच्या पालकांना तिला भारतात पाठवणे सोयीचे मानले नाही. त्यामुळे त्यांचे नाते तुटले.