तुम्ही बीयरची बाटली मस्त उघडली आहे, ती स्वच्छ ग्लासमध्ये ओतली आणि बाहेर उन्हात बसला आहात? तुम्ही थोडया वेळाने बीयरचा एक घोट घेण्यासाठी परत आला,बीयर आता चविला थोडी वेगळी वाटते.जर तुम्ही तुमच्या आवडीच्या बीयरची मजेदार चव अनुभवली असेल, पण काही काळ बाहेर असणाऱ्या बियर ची दुर्गंध तुमच्या लगेचच लक्षात येईल.
१९६० च्या दशकापर्यंत “स्कंकिंगचे”(काही काळ बाहेर असणाऱ्या बियर ची दुर्गंध) कारण खरोखरच समजले नव्हते.
जेव्हा बिअरमधील हॉप्स तीव्र प्रकाशाच्या संपर्कात येतात, तेव्हा एक फोटोऑक्सिडेशन प्रतिक्रिया होते, ज्यामुळे मिथाइलचे ३,२-ब्युटेनचे आणि-१-थिओल संयुग तयार होतात. यामुळेच स्कंकिंगची प्रक्रिया होण्यापासून रोखण्यासाठी, बिअर बाटलीला गडद रंगाच्या काचेचा पर्याय निवडला गेला.म्हणूनच आज तुम्हाला तपकिरी, किंवा थोड्या जास्त गडद काचेच्या बाटल्यांमध्ये बिअर बघता. या गडद रंगाच्या बाटली मुळेच आपली आवडती बिअर आपली चव जपून ठेवते.
जशी बाटली तशी बियर ची चव ह ह ह…
तपकिरी हाच रंग बिअरच्या बाटल्यांमध्ये दिसत नाही.काही हिरव्या काचेच्या बाटल्याठी बियर मिळते त्या निवडीमागे काय कारण आहे? हिरवा रंग प्रकाशापासून तितकासा संरक्षक नाही हे लक्षात घेता, त्याच्या हिरव्या बाटली वापरान्याचे कारण मुख्यतः मार्केटिंग किंवा एक आकर्षक रंग म्हणून.
हिरव्या काचेत कोणते ब्रँड आहेत हे तुम्ही पाहिल्यास, तुम्हाला बहुधा हेरिटेज ब्रँड जे आपली मार्केट मध्ये लोकांचे आवडीचे आहेत तेच सापडतील. बऱ्याच प्रमाणात युरोपियन बियर कंपन्या हिरवी बाटली वापरतात. त्यांच्या हिरव्या बाटल्या ही त्यांची ओळख आहे. अनेक दशकांपूर्वी , हिरव्या काचेच्या गुणवत्तेचा आणि विशिष्टतेचा एक विशिष्ट संबंध होता. त्यामुळे आपल्या भारतातही आता अनेक कंपन्या हिरवाच रंग आपल्या बियर च्या बाटल्यांना युरोपीय देशांशी बरोबरी करण्यासाठी देतात.
बीयर पिनाऱ्यांनी ही बाब लक्षात घ्या…
जर आता वापरात असलेली हिरवी काच स्कंकिंग टाळण्यासाठी पुरेशी गडद रंगाची नसली तरी ,ग्राहक तोऱ्यात म्हणतील, “अरे, बघा, या बियर ची चव वेगळी आहे. कारण ती युरोपमधून मागवलेली आहे. ती चांगली असली पाहिजे.”
प्लॅस्टिकपेक्षा पॅकेजिंग मटेरिअल म्हणून काच निवडण्याचा प्रश्न येतो तेव्हा, काच हा केवळ पर्यावरणास अनुकूल आहे आणि ग्राहकांना उच्च दर्जाचा दिसतो असे नाही, तर ते बिअरला शिळे होण्यापासून प्रतिबंधित करते, कारण प्लास्टिक बिअरमध्ये कार्बनचे उत्सर्जन करू देते,कालांतराने ऑक्सिजनमध्ये आणि यामुळे बियर खराब होते.
बीयर म्हणजे नेमके काय???
बिअर हे मुळात पाणी, बार्ली, काहीवेळा गहू, हॉप्स आणि यीस्ट यांचे एक रासायनिक मिश्रण आहे . बियर हे एक अन्न उत्पादन आहे. इतर कोणत्याही खाद्यपदार्थाप्रमाणेच, तेही त्याचा ताजेपणा गमावण्याच्या अधीन आहे.कोणत्याही खाद्यपदार्थाचा ताजेपणा गमावण्यास कारणीभूत ठरते — या फोटोकेमिकल अभिक्रिया ज्यामुळे कुठल्याही खाद्य पदार्थात खराब होते, ते कारण म्हणजे ऑक्सिजनचा संपर्क आणि उबदार तापमान.
जर तुम्ही कधीही घरात बियरवर प्रयोगासाठी तयार असाल, तर काही तास सूर्यप्रकाशात बिअर ठेवा आणि तुम्ही स्वतःसाठी स्कंकिंगचा म्हणजेच उबट किंवा खराब बियर चा स्वाद घेऊ शकता.