अनेकांनी आपल्या लहानपणी सायकल चालवली असेल अनेक लोक तर आजही आपल्या नित्याच्या कामाच्या ठिकाणी सायकलने प्रवास करतात. बच्चे कंपनीला तर आजही सायकलचे अप्रुप आहे. कोरोना काळात अनेक उद्योग बुडाले त्यात पेट्रोल च्या किंमती वाढल्या त्यामुळे अनेकांनी आपली बाईक घरी ठेऊन सायकलिंग करण्याचे ठरविले आहे.
सायकल उद्योग वाढीचे प्रमुख कारण:
सरकारने वेळोवेळी लोकडाऊन करून जिम, उद्याने , झुंबा क्लब इत्यादींवर गर्दी होत असल्याने बंदी घातली होती. त्यात लोकांना रोजच्या आयुष्यात व्यायाम करणे आवश्यक होते. मग अनेकांनी सायकलींग करण्याचे ठरविले. एकेकाळी ओस पडले असलेले सायकल मार्केट आता आणखी जोमात सुरू झाले. अनेक विक्रेते आता दुसऱ्या देशातील अन्य कंपन्यांची सायकल सुद्धा उपलब्ध करून देत आहेत.
YouTube वर सायकलिंग ब्लॉगर्स हिट:
आता YouTube वर अनेक लोक सायकलिंग चे ब्लॉग शेअर करत असतात त्यात ते नवीन आलेल्या सायकली, सायकल दुरुस्ती यांचे अनेक प्रात्याशिक करून दाखवतात. अनेक सायकल कंपन्या या ब्लॉगर कडून आपल्या सायकल ची जाहिरात ही करून घेत आहेत. त्यात आता बॅटरी बॅकअप असणाऱ्या सायकली ही अनेकांच्या पसंदिस पडत आहेत. आज एका चांगल्या सायकल ची किंमत ३००० ते १ लाख इतक्या दरात आहेत.
सायकल चालविण्याचे फायदे:
१) सायकलिंग हा एरोबिक प्रकार आहे. त्यामुळे शरीरावर जास्त ताणही पडत नाही आणि दुखापत कमी होते.
२) वजन कमी करण्यासाठी आठवड्यातून 3 दिवस सायकलिंग जरूर करावे. एका तासात ५०० ते ८०० कॅलरीज सायकलिंगमुळे खर्च होतात.
३) नियमित सायकल चालवल्यानं हृदय फुफ्फुसे आणि रक्त प्रवाह सुधारतो. यामुळे हृदय विकाराचं प्रमाण कमी होतं. हृदयाच्या मांसपेशींची ताकद वाढते. फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढते.
४) मधुमेह प्रकार २ चे प्रमाण लोकांमध्ये जास्त प्रमाणात आढळून येते. कमी कष्टाची कामे किंवा व्यायामाचा अभाव यामुळे मधुमेह होण्याची शक्यता असते. जे लोक दररोज ३० मिनीटं सायकल चालवतात त्यांना मधुमेह प्रकार-२ होण्याची शक्यता ४० टक्क्यांनी कमी होतो.
५) सायकल चालवण्याने ताकद, समतोल आणि समन्वय हे शारिरीक गुण वाढतात. यामुळे खाली पडणे, हाडे मोडणे याची शक्यता कमी होते. सायकल चालवताना सांध्यावर ताण कमी पडतो त्यामुळे दुखापत कमी होते.
६) मन उदास होणे, ताण तणाव, चिडचिडेपणा येणं हे सर्व सायकलिंगनं कमी होतं.
अश्याच आणखीन बातम्यांसाठी मराठीshout वर भेट द्या आणि शेअर करा.