उन्हाळ्यात मागणी वाढली की विजेचा तूटवडा निर्माण होते . त्यामुळे बिल सुद्धा वाढीव दराने आकरले जाते. त्यातच फ्रिज, AC, फॅन, कूलर इत्यादि चा वापर उन्हाळ्यात वाढतो त्यामुळे खिशाला आर्थिक झळ बसु शकते त्यासाठी बिल कमी करण्याचे उपाय बघू
जास्त स्टार जास्त बचत
आपन बरेच वेळेस बघतो की विविध उपकरानाच्या दर्शनी भागावर स्टार चे स्टिकर असते. हेच स्टिकर स्टार रेटिंग चे असून ब्यूरो ऑफ एनर्जी इफ्फीसेंसी(BEE) इंडिया चे आहे BEE इंडिया ही संस्था उपकरणातील विजेचा वापर कसा कमी करण्यात येईल या वर संशोधन करते. उपकरणावर जेवढे जास्त स्टार तेवढे विज बिल कमी असे स्टिकर वरुण कळते.
बल्ब बदला
घरातील जुने म्हणजेच CFL किवा पिवळ्या बल्ब च्या जागी LED बल्ब लावा. 15 वॉट च्या आणि 5 वॉट च्या LED बल्ब चा प्रकाश सारखच असतो. त्यामुळे बचत होण्यास मदत होईल. ट्यूबलाइट च्या ऐवजी बल्ब वापरण्यास प्राधान्य दया.
पंखे
उन्हाळ्यात पंखे फार वेळ चालू असतात त्यामुळे तासला 75 वॉट विद्युत ऊर्जा घेतात. त्यासाठी आधुनिक तंत्रद्यान असलेले BLDC फॅन चा वापर करावा. तसेच अधिक BEE रेटेड फॅन वापरावे.
AC वापरताना
Ac ची सर्विसिंग तसेच फ़िल्टर ची जाळी वेळोवेळी स्वछ करुण घ्या. तसेच जूना म्हणजे 8 ते 10 वर्ष्या पूर्वी चा AC असेल तर तो बदला. इन्वर्टर आधारित AC वापरा . गरज नसताना AC बन्द करुण ठेवा. हे सर्व उपाय योजना केल्या तर वर्ष्या काठी 15000 रूपयांची बचत होवू शकेल.
फ्रिज
फ्रिज हे उपकरण दिवसभर चालू असते. घरातील ऐकून वापरच्या 15%फ्रिज चा वापर असतो त्यामुळे फ्रिज जास्त स्टार रेटिंग चे असावे. फ्रिज आणि भिंति मधे 2 इंच अंतर असावे. बाहेर गावी जाणार असल तर फ्रिज बंद ठेवावे.
लेखन –
वैभव रुद्रवार