आशिया कप 2022 चा अंतिम सामना श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान यांच्यात दुबई मधे खेळला गेला. दुबईत सुरू असलेल्या आशिया कप स्पर्धेचे हे १५ वे सत्र होते.
पाकिस्तानने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंका संघाची सुरुवात खराब झाली. नसीम साहच्या तिसऱ्या चेंडूवर कुसल मेंडिस खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला.
पॉवर प्लेमध्ये श्रीलंकेने 42 धावांत 3 गडी गमावले, नंतर फलंदाजीस आलेल्या भानुका राजपक्षाने डाव सांभाळत वनिंदू हसरंगाच्या साथीने 33 चेंडूत 50 धावांची भागीदारी केली. वनिंदू हसरंगाने हरीस रौफच्या गोलंदाजीवर रिझवान कडे झेल दिला. वनिंदू हसरंगाने संघासाठी 36 धावा केल्या.
त्यानंतर एका टोकाकडून डाव सांभाळत भानुका राजपक्षाने 35 चेंडूत अर्धशतकी खेळी करत श्रीलंकेला 20 षटकांत 6 गडी गमावून 170 धावसंख्येपर्यंत पोहचवले. भानुका राजपक्षा सर्वाधिक धावसंख्या 71 धावांवर नाबाद राहिला.
पाकिस्तानकडून हरिस रौफने सर्वाधिक ३ बळी घेतले. विजयासाठी १७१ धावांचा पाठलाग करताना पाकिस्तान संघाची खराब सुरुवात झाली. तिसऱ्या षटकात प्रमोद मधुशने पाकिस्तानला दोन मोठे धक्के दिले. खराब फॉर्म मधे असणारा पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझम ५ धावा काढून बाद झाला. त्यानंतर आलेला फकर जमान शून्यावर बाद झाला. त्यानंतर संघाची धावसंख्या 3. 3 षटकांत 2 गडी गमावून 22 धावा अशी झाली.
त्यानंतर फलंदाजीला आलेल्या इफ्तिखार अहमदसोबत रिझवानने डाव पुढे नेत तिसऱ्या विकेटसाठी ७१ धावांची भागीदारी केली. रिझवानने 55 धावा केल्या. आणि वनिंदू हसरंगाचा बळी ठरला.
श्रीलंकेकडून सर्वाधिक विकेट प्रमोद मधुशनने 4, वनिंदू हसरंगाने 3 आणि करुणारत्नेने 2 विकेट घेतले.
विजयासाठी 171 धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ 20 षटकांत अवघ्या 147 धावांवर गारद झाला.
आणखी हे वाचा : श्रीलंका संघाची आशिया कप २०२२ मधील कामगिरी जाणून घेऊया.
श्रीलंकेने 23 धावांनी सामना जिंकून आशिया कप 2022 चे विजेतेपद पटकावले. श्रीलंकेचे हे सहावे आशिया चषक विजेतेपद ठरले.संघासाठी नाबाद 71 धावांची खेळी करणारा भानुका राजपक्षा हा सामनावीर ठरला.