तुमचे मन हे तुमचे सर्वात मौल्यवान धन आहे. ते सतत तुमच्यासोबत असते पण आपल्यापैकी बहुतांश लोकांना हे माहिती नसते कि ते कसे कार्य करते व त्याची कार्यप्रणाली कशी असते. मानसशास्त्र आणि मानस चिकित्सक यांच्या मते मनात अपरंपार शक्ती आहे व त्यांचा वापर करून आपण आपल्या आयुष्यात यश प्राप्ती करू शकतो.तर हे आपले मन कसे कार्य करते याबाबतचा हा सविस्तर वृत्तांत.
मनाचे दोन स्तर असतात – चेतन (Conscious mind ) किंवा तार्किक स्तर आणि अचेतन (Unconscious or subconscious mind ) किंवा अतार्किक स्तर. तुम्ही तुमच्या चेतन मनाद्वारे विचार करता. तुम्हाला सतत विचार करायची सवय असते,ते विचार चेतन मनातून झीरपत अचेतन मनात जातात. विचारानुरूप परिस्तीथी निर्माण करते. तुमचे अचेतन मन हि तुमच्या भावनांची असते आणि ते सृजनात्मक मन असते. तुम्ही चांगला विचार केला तर चांगलेच होईल ,वाईट विचार केला तर वाईट होईल. अश्या रीतीने तुमचे मन कार्य करत असते.
महत्वाचा मुद्दा असा आहे कि,एकदा तुमच्या अचेतन मानाने (Unconscious or Subconcsious mind ) एखादी कल्पना स्वीकारली कि,ते लेगच ती अमलात आणायला सुरवात करते.हे एक अत्यंत आश्चर्यकारक व सरळ सत्य आहे कि,अचेतन मन चांगल्या व वाईट दोन्ही प्रकारचे विचार अमलात आणायला सारख्याच रीतीने कार्य करते.या नियमानुसार नकारत्मक विचार हे अपयशाला, विफलतेला व निराशेला उत्पन्न करण्यास कारणीभूत ठरतात. जर तुम्हाला नेहमीच सुसंवादी आणि रचनात्मक विचार करण्याची सवय असेल तर तुम्हाला संपूर्ण आरोग्य, यश आणि उन्नतीचा अनुभव येईल.
तुमच्या मनाचा नियम हा आहे : तुम्हाला मिळणारी अचेतन मनाची प्रतिकिया हि तुमच्या चेतन मनातील विचारांवर अवलंबून असते.
मानसशास्त्र आणि मानस चिकित्सक सांगतात की , जेव्हा तुमच्या अवचेतन (Unconscious or Subconscious mind ) मनाकडे विचार पाठविले जातात तेव्हा त्याचे ठसे हे मेंदूच्या पेशींवर उमटतात.
अचेतन मानाने एखादा विचार स्वीकार केला की, लगेच तो अमलात आणायला ते सिद्ध होते.हा हेतू साध्य करण्यासाठी तुम्ही आयुष्यभर जे ज्ञान मिळवले आहे ते सगळे विचारांच्या अपार शक्ती,ऊर्जा आणि शाहाणपण ते उपयोगात आणते.
चेतन व अचेतन मनातील फरक
म्हणत्वची गोष्ट म्हणजे चेतन (Conscious mind ) व अचेतन अचेतन (Unconscious or Subconscious mind ) हि दोन वेगवेगळी मने नाहीत.ती एकाच मनाच्या कार्यपद्धतीची दोन क्षेत्र आहेत. तुमचे चेतन मन हे तार्किक मन आहे.ती मनाची अशी स्थिती आहे.ती मनाची अशी स्थिती आहे जिथे विकल्याची निवड केली जाते. अदाहर्णार्थ, तुम्ही पुस्तक निवडता,घर निवडता आणि तुमच्या जीवनाचा जोडीदार निवडता.तुम्ही हे सगळे निर्णय चेतन (Conscious mind ) मनाच्या मदतीने घेता,तर दुसरीकडे तुम्ही जाणीवपूर्वक कोणतीही निवड न करताही तुमचे हृदय आपोआप कार्य करीत राहते,महत्त्वाच्या जीवनरक्षक प्रक्रिया जसे पचन,रक्ताभिसरण आणि श्वसन या चालू राहतात.या सगळ्या क्रिया,तुमचे अचेतन मन तुमच्या जाणीवपूर्वक नियंत्रणाशिवाय करीत असते.
तुमच्या अचेतन मनावर तुम्ही जी छाप किंवा ठसे टाकता ते ठसे किंवा तुम्ही जाणीवपूर्वक ज्या गोष्टीवर विश्वास ठेवता त्या सगळ्या गोष्टी तुमचे अचेतन मन स्वीकारते. तुमच्या चेतन (Conscious mind ) मनासारखे ते तर्क-कुतर्क करीत बसत नाही तसेच ते तुमच्या विरोधात वादही घालत नाही.
तुम्ही मानाने जो काही दावा करता आणि त्याला सत्य मानता तो दावा तुमचे अचेतन (Unconscious or Subconscious mind ) मन प्रत्यक्षात आणते,तुम्हाला इतकेच करायचे आहे कि,तुमच्या अचेतन मनाला तुमचा विचार स्वीकार करायला लावायच.एकदा तुमच्या अचेतन मनाने तुमचा विचार स्वीकारला कि, ते तुमच्यासाठी तुम्ही इच्छिलेले आरोग्य,शांती व समृद्धी तुमच्या आयुष्यात घेचून आणेल.
जर तुमच्या हा वृत्तांत आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि ताज्या माहितीसाठी मराठी Shout ला subscribe करा