अनेक स्त्रियांना वेगवेगळे आभूषण म्हणजेच अलंकार परिधान करण्याची आवड असते. स्त्रियांचे दागिन्यांनविषयी प्रेम हे अधिकच त्यांना आकर्षित करते. नवविवाहितेचे लग्न झाल्यावर तिला काही दागिने नेहमीसाठीच घालावे लागते. परंतु यात काही स्त्रियांना मंगळसूत्र, जोडवी, बांगड्या हे न परिधान केलेले त्यांना आवडते. परंतु जर काही स्त्रिया अश्या करत असतील. तर त्यांनी आधीच सावध झाले पाहिजे. कारण लग्नानंतर अलंकार परिधान न करणाऱ्या स्त्रियांच्या आरोग्यावर त्याचा वाईट परीणाम होऊ शकतो. होय ! खरंतर त्याकाळी प्राचीन ऋषींनी असे काही साधन निर्मित केले ज्याने मन आणि आरोग्याची रक्षा होऊ शकते. मागणी वाढल्याने यांना सुंदर दागिन्याचा रूप मिळाला आणि हे नियमपूर्वक घातले जाऊ लागले. आणि आज स्त्रियांच्या वेगवेगळ्या दागिन्यांमध्ये भरपुर प्रकार पाहायला मिळतात. दागिने स्त्रियांच्या रूपाला सुभोभित करत असतात. दगिण्यांशिवाय स्त्री ही अपूर्ण आहे. त्यामुळे आज आपण जाणून घेणार आहोत स्त्रियांच्या दागिन्यांचे फायदे, लाभ आणि त्यामागील वैज्ञानिक कारण.
Why woomen need to wear jewellery?
टिकली का लावावी ?
टिकली दोन्ही भुवयांच्या मध्यभागी ज्या ठिकाणी लावली जाते शरीरातील सर्व नसा त्याच केंद्रावर एकत्र येतात. टिकली लावण्यात येणा-या या जागेला अग्नि चक्र या नावाने सुद्धा ओळखले जाते. म्हणूनच टिकली लावल्याने एकाग्रताही वाढते आणि मन शांत राहते. तसेच, टिकली लावल्याने ताण-तणावही कमी होतो.
टिकली डोळ्यांच्या नसा मजबूत करण्यास खुपच मदत करते. टिकली कपाळ्याच्या मध्यभागी ज्या ठिकाणी लावली जाते त्या ठिकाणच्या नसा आणि डोळ्यांमधील नस यांच्यात एक कनेक्शन असते. टिकली डोळ्यांच्याच्या नसांना मजबूत करण्यास मदत करते ज्यामुळे तुम्हाला एकदम स्पष्ट आणि साफ दिसण्यास मदत होते. एवढेच नाही तर टिकली लावल्याने आस-पासचे मसल्स मजबूत आणि हेल्दी होतात.
मंगळसूत्र का घालावे ?
दोन सोन्याच्या वाट्या आणि काळ्या मण्यांनी बनवलेल्या मंगळसूत्राचे अनेक महत्त्व आहे. सोन्याचे दोन वाट्या सत्वगुणांशी संबंधित आहेत, जे शिव आणि शक्तीचे प्रतीक दर्शवते. हृदययाच्या संबंधित समस्या दूर ठेवण्यासाठी देखील हे लाभदायक मानल्या जाते. शक्यतो या वाट्यांवर कुठल्याही प्रकारचे डिझाईन नसावे. यासोबतच काळे मोती वाईट नजर आणि नकारात्मक शक्तींपासून संरक्षण करतात असे मानले जाते. शास्त्रानुसार मंगळसूत्रांमुळे रक्ताभिसरण सुधारते आणि शरीरातील रक्तदाब नियंत्रणात ठेवते. याच कारणामुळे ते छातीजवळ घातल्या जाते.
बांगडी घालण्याचे फायदे
बांगडी मनगटावर घासली जाते ज्याने हाताचं रक्त संचार वाढतं. हे घर्षण ऊर्जा व्युत्पन्न करतं ज्याने लवकर थकवा जाणवत नाही. बांगडी घातल्याने श्वासासंबंधी आजार, हृदयासंबंधी आजार होण्याची शक्यता कमी होते.
बांगडी घातल्याने मानसिक संतुलन उत्तम ठेवण्यास मदत मिळते.
तुटलेली बांगडी घालू नये. याने नकारात्मक ऊर्जा वाढते.
जोडावी का घालावी ?
विवाहित स्त्रिया पायाच्या तीन बोटांमध्ये जोडवी घालतात. हा दागिना केवळ शृंगाराची वस्तू नाही. दोन्ही पायात जोडवी घातल्याने हार्मोनल सिस्टम योग्य रित्या कार्य करतं.
जोडवी घातल्याने थायरॉईडचा धोका कमी असतो.
जोडवी ऍक्युप्रेशर उपचार पद्धतीवर कार्य करतात ज्याने शरीराचे खालील अंगाचे मज्जासंस्था आणि स्नायू मजबूत राहतात.
जोडव्यांमुळे एका विशिष्ट रक्तवाहिनीवर दाब निर्माण होत असल्यामुळे गर्भाशयाला रक्तपुरवणा सुरळीत होतो. या प्रकारे जोडवी स्त्रियांची गर्भधारण क्षमता निरोगी ठेवते.
याने मासिक पाळी नियमित होते.
पैंजण का घालावे ?
पैंजण पायातून निघणार्या शारीरिक विद्युत ऊर्जा शरीरात संरक्षित ठेवते.
पैंजण स्त्रियांच्या पोट आणि खालील भागातील अंगात फॅट्स कमी करण्यात मदत होते.
वास्तुच्या मते पैंजणातून येणारा स्वराने नकारात्मक ऊर्जा दूर होते.
चांदीची पैंजणाचे पायाला घर्षण होत असल्याने पायाचे हाड मजबूत होतात.
पायात पैंजण घातल्याने महिलांची इच्छा-शक्ती मजबूत होते. याच कारणामुळे स्त्रिया स्वत:च्या आरोग्याची काळजी न करता कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यात दिवस घालवून देते.
पायात सोन्याची पैंजण घालू नये. याने शारीरिक उष्णतेचे संतुलन बिघडून आजार होण्याची शक्यता असते.